अनिता केळकर
ग्रहांची अनुकूलता मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणेल. कामातील अडथळे दूर होतील. नवीन कामांना प्रारंभ होईल. नोकरीत विरोधकांचा विरोध मावळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. हातून कौतुकास्पद काम होईल. ठरवलेले बेत सफल होतील.
हाती घ्याल ते तडीस न्याल. व्यवसायात तुमची मते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न कराल. हातून चांगली कामे पूर्ण होतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत इतरांना न जमलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. कामानिमित्ताने प्रवास घडेल, नवीन ओळखी होतील. सामूहिक कामात सहभागी व्हाल. प्रकृतीची चिंता मिटेल.