साप्ताहिक राशिभविष्य ( ०७ मे २०२३ ते १३ मे २०२३)

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
weekly horoscope weekly rashi bhavishya in marathi sakal 7 May 2023 to 13 May 2023
weekly horoscope weekly rashi bhavishya in marathi sakal 7 May 2023 to 13 May 2023Sakal
Updated on

अपघातापासून काळजी घ्या

मेष : रवी-हर्षल युतियोगाचं फिल्ड भरणी नक्षत्रास सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी अपघातानुकूलच राहील, कोणताही अतिरेक नको. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणातून ता. ९ व १० हे दिवस महत्त्वाच्या कामातून हुकमी यश देणारे. प्रेमिक मंडळी विवाहाकडे मार्गस्थ होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पित्तप्रकोपाचा त्रास.

आर्थिक कोंडी दूर होईल

वृषभ : शुक्रभ्रमणाच्या ओव्हर्स ता. ९ व १० या दिवसांत धावा काढून देतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी जाईल, व्यावसायिक वसुली होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सहली - करमणुकीतून चैन, चंगळ, मौजमजेचा ठरेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार प्रवासात जपण्याचा कालखंड, तसंच वाहनांपासून सांभाळा.

व्यावसायिकांना उत्तम कालखंड

मिथुन : राशीचं शुक्रभ्रमण सप्ताहात मोठी फळं देईल. स्वतंत्र व्यावसायिकांसाठी या आठवड्यात एक सुंदर पर्व सुरू होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ व १० हे दिवस जोरदार फलंदाजीचे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट कोर्ट प्रकरणं सोडवणारा. सप्ताहाची सुरुवात पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना वेदनायुक्त व्याधींतून त्रासाची. दंतव्यथा त्रास देईल.

तरुणांनी उन्माद टाळावा

कर्क : रवी-हर्षल योगाच्या फिल्डवर मंगळाचं राशीत आगमन होत आहे, तरुणांनी उन्माद टाळावा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात सांभाळावं. ता. १० ते १२ हे दिवस हे विचित्र गाठीभेटींचे. बाकी उद्याची संकष्टी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना संकटविमोचन करणारी आहे. ता. ११ चा गुरुवार घरात जल्लोषाचं वातावरण आणणारा.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

सिंह : सप्ताहात रवी-हर्षल युतियोगाचं फिल्ड तरुणांना स्पर्धात्मक यशातून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारं. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. ता. ९ व १० हे दिवस मघा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी देतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ, वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कला, छंद या माध्यमातून लाभ आणि प्रसिद्धी.

वास्तुविषयक व्यवहार होतील

कन्या : सप्ताहात गर्भवतींनी सांभाळावं. बाकी सप्ताहातील शुक्रभ्रमण व्यावसायिक आर्थिक ओघ उत्तमच ठेवेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वसुलीत यश, विशिष्ट वास्तुविषयक व्यवहार होतील. हस्त नक्षत्रास ता. १२ चा शुक्रवार न्यायलयीन कामकाजात यश देणारा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० व ११ हे दिवस विचित्र गाठीभेटीचे.

कुसंगती घातक ठरेल

तूळ : वक्री बुधाच्या पार्श्वभूमीवरील रवी-हर्षल योगाचं फिल्ड कुसंगतीतून घातक ठरू शकतं. राजकीय शत्रुत्वातून त्रास. बाकी भाग्यातील शुक्रभ्रमण चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी वैयक्तिक उपक्रमातून छानच राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ व १० हे दिवस व्यावसायिक उलाढालीतून आर्थिक लाभ देतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार सरकारी जाचाचा.

रागावर नियंत्रण राखा

वृश्‍चिक : सप्ताह नैसर्गिक पाठबळ देणार नाही. महत्त्वाच्या कामांचं नियोजन नीट करा. अपवादात्मक घडू पाहणाऱ्या गोष्टींचं भान ठेवा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी राग आवरावा. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची उद्याची (सोमवार) संकष्टी धनचिंता घालवेल. स्वतंत्र व्यावसायिकांना वास्तुयोग. ता. १३ चा शनिवार एकूणच सुवार्तांचा.

अनपेक्षित गाठीभेटी होतील

धनू : सप्ताहातील ग्रहमान मोठं मजेदारच राहील. अपवादात्मक पार्श्वभूमीवर लाभ होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अनपेक्षित गाठीभेटी वा घटना, परिस्थितीतून लाभ होतीलच. ता. ८ ते १० हे दिवस वेगवानच राहतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची संकष्टी चंद्रोदयातून खरोखरच भाग्योदयाची. उत्तराषाढा व्यक्तींनी ता. १० व ११ हे दिवस मित्रसंगतीतून जपावेत.

वितंडवाद टाळाच

मकर : सप्ताहातील ग्रहमानाचा रोख धनिष्ठा नक्षत्रावर जास्त अंमल करू शकतो. सहवासातील व्यक्तींची मनं सांभाळा. अकारण वितंडवाद नकोतच. अहंकार सांभाळा. ता. ८ व ९ हे दिवस श्रवण नक्षत्रास धनचिंता घालवणारे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारचा सूर्योदय मोठा भाग्यलक्षणी, मोठ्या सुवार्ता मिळतील, परदेशी भाग्योदय.

मोठं यश देणारा कालखंड

कुंभ : कला, छंद आदी उपक्रमांतून मोठं भव्य यश देणाराच सप्ताह राहील. शैक्षणिक वा संशोधन क्षेत्रातील मंडळींना सप्ताह मोठ्या प्रकाशात आणणारा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मोठं ग्लॅमर देईल. ता. ८ ते १० हे दिवस विजयी चौकार - षटकारांचेच. घरातील तरुणांचेसुद्धा भाग्योदय होतील. पूर्वाभाद्रपदी नक्षत्राच्या व्यक्तींनी यंत्रापासून सांभाळावं.

ओळखी, मध्यस्थीमधून नोकरी

मीन : मंगळभ्रमणाचं हाय व्होल्टेज राहणारच आहे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी मंगळवार सांभाळावा. यंत्रं, वाहनं जपा. रहदारीत जपा. बाकी उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची संकष्टी चंद्रोदयातून भाग्याचीच. नोकरीत भाग्योदय. घरात तरुणांची विवाहकार्यं ठरतील. व्यावसायिकांना शुक्रवार उत्सव, प्रदर्शनातून लाभदायी. तरुणांना ओळखी मध्यस्थीतून नोकरी. स्पर्धात्मक यश.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com