परिश्रम व संयम या दोन्हीचा मेळ घालून कार्य न केल्यास त्रास जाणवेल. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो.
-निखिल शेंडूरकर
Gemini Horoscope 2025 : ‘आपण भले आणि आपले काम भले’ असे धोरण ठेवून जगणे तसे काहीसे अवघड असते; पण मिथुन राशीने यंदाच्या वर्षामध्ये असे धोरण अवलंबणे हिताचे आहे. कोणत्याही कार्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वबळावर वाटचाल करावी लागेल. प्रत्येक संगत ही तपासूनच घ्यायला हवी, हा या वर्षाचा धडा आहे. चैनी व विनाकारण खरेदी करण्याकडे वाढणारा कल टाळायलाच हवा. दुसरीकडे साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना मानसन्मान लाभण्याचे योग आहेत. जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही मागे हटत नाही.