तारे-तारकांचे ‘मत’ सेलिब्रेशन!

मंगळवार, 30 एप्रिल 2019

मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा सल्लाही अनेकांनी दिला. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे मुंबई आणि परिसरातील चित्रीकरण दोन-तीन तास बंद ठेवण्यात आले होते. 

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी जुहू येथे, तर आमीर खान आणि पत्नी किरण राव यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रात मतदान केले. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, सलमान खान, अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, फरहान अख्तर, ऐश्‍वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित-नेने, रणबीर कपूर, अजय देवगण, इमरान हाश्‍मी, तारा सुतारिया, शाहरूख खान, रणवीर सिंग आदींनी मतदान केले. मराठी कलाकार स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, प्रिया बापट, आदीनाथ कोठारे, ऊर्मिला कानिटकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, स्पृहा जोशी आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, त्यांचा मुलगा आणि सून आदींनी ताडदेव येथील मतदान केंद्रात मतदान केले; मात्र ताप असल्याने गानसम्राज्ञी लता मंगेशकर मतदान करू शकल्या नाहीत, असे उषा मंगेशकर यांनी सांगितले.