एका हरहुन्नरी अवलियाचा स्मृतीदिन!

बुधवार, 12 जून 2019

महाराष्ट्राचं लाडकं आणि वल्ली व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतीदिन! 

शिक्षक, लेखक, नाटकार, विनोदी अभिनेते, दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिका खऱ्या आयुष्यात तसेच रंगभूमिवर रंगविणाऱ्या खळाळत्या झऱ्याचा आज स्मृतीदिन! असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली, गुळाचा गणपती, बटाट्याची चाळ, हसवणूक, अपूर्वाई, एक शून्य मी अशा कलाकृतींचे कलाकार पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु. ल. देशपांडे यांनी 12 जून 2000 रोजी अखेरचा श्वास घेतला. मराठी भाषेला विविध पैलू देऊन त्यांनी मराठीला विनोदाची झालर देत लेखनाचे एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले. 

अशा लाडक्या, विनोदी पुलंच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...