नाचू कीर्तनाच्या रंगी!

शुक्रवार, 28 जून 2019

गाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ! ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे  वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’ प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते. 

गाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ! ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे  वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’ प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते. 

जिनं चालायला शिकवलं, तिच्यासाठी चार पावलं चालू या... तिच्या जपणुकीची शपथ घेऊ या... असा निर्धार करत पुणेकर ‘सकाळ’च्या ‘साथ चल’ दिंडीत मनापासून सहभागी झाले. त्यात विद्यार्थी, कार्यकर्त्यांपासून  विविध क्षेत्रांतील पुणेकरांचा समावेश होता. दिंडीचे हे चित्रमय दर्शन.

‘साथ चल’ दिंडीत सहभागी झालेले मान्यवर
महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, बिशप थॉमस डाबरे, रवींद्र मुनीजी, ऋषिमुनीजी, अर्हम मुनीजी, लतीफ मगदूम, कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, रमेश बागवे, मोहन जोशी, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, अजय खेडेकर, सम्राट थोरात, मनीषा लडकत, महेंद्र कांबळे, दिलीप गिरमकर, अतुल गायकवाड, महेश लडकत, विनोद मथुरावाला, गोपाळ चिंतल, सचिन तावरे, धनराज घोगरे, 
माधुरी गिरमकर, मकरंद टिल्लू आदी.

शाळा-महाविद्यालये
कॅम्प एज्युकेशन संस्था, रवींद्रनाथ टागोर स्कूल, सेंट मीरा स्कूल, पूना कॉलेज, आबेदा इनामदार सीनियर कॉलेज- आझम कॅम्पस, अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, स्वानंद आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था.

संस्था, संघटना
जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र विभाग, जैन संघ, कर्तव्य फाउंडेशन, युवा प्रतिष्ठान, बजमे रहेबर कमिटी, मुस्लिम वेल्फेअर औकाफ कमिटी, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट, सैनिक मित्रपरिवार, पिरॅमिड ध्यानप्रचार फाउंडेशन, बाबू गेनू मंडळ, तान्हुराम कल्याणकारी संस्था, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, तुळशीबाग मंडळ, चिंचेची तालीम मंडळ, सारसबाग मंडळ, नवचैतन्य हास्यक्‍लब, शिवनेरी रिक्षा संघटना, समता सामाजिक आयटी ग्रुप, लायन्स क्‍लब, रोटरी क्‍लब, 
पुणे बार असोसिएशन, माहेश्‍वरी महिला मंडळ.

छायाचित्रे - मंगेश महाले, गजेंद्र कळसकर, शहाजी जाधव