गणेशोत्सव 2019 : पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठापना

Monday, 2 September 2019

पुणे : ताशाचा तर्रर्र आवाज, ढोलाचा ठेका, आकर्षक सजावट केलेले रथ अन् 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, पावसाच्या तुरळक सरी अशा भक्तीमय वातावरणात पुणेकर चिंब झाले. पुण्यातील मानाच्या पाचही गणपती मंडळांमध्ये विधीवत श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना आकर्षक सजावट केलेल्या उत्सवमंडपात करण्यात आली.तर  मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची चांदीच्या रथात मिरवणून काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मनमोहक गज रथातून मिरवणूक काढण्यात आली.

पुणे : ताशाचा तर्रर्र आवाज, ढोलाचा ठेका, आकर्षक सजावट केलेले रथ अन् 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, पावसाच्या तुरळक सरी अशा भक्तीमय वातावरणात पुणेकर चिंब झाले. पुण्यातील मानाच्या पाचही गणपती मंडळांमध्ये विधीवत श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना आकर्षक सजावट केलेल्या उत्सवमंडपात करण्यात आली.तर  मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची चांदीच्या रथात मिरवणून काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मनमोहक गज रथातून मिरवणूक काढण्यात आली. तर मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक फुलांनी सजलेल्या रथातून काढण्यात आली होती.केसरीवाडा मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केसरी वाड्यात संभाजी भिडेंच्या हस्ते करण्यात आली