शारापोवाचे विजयी कमबॅक!

गुरुवार, 27 एप्रिल 2017

ड्रग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने लादलेल्या बंदीचा कालावधी संपल्यानंतर रशियाची स्टार टेनिसपटू मारिया शारापोवाने कोर्टवर थाटातच पुनरागमन केले. तिने इटलीच्या रॉबर्टा व्हिंचीवर ७-५, ६-३ अशी मात केली. आता पुढच्या फेरीत तिची लढत रशियाच्या येकतरिना माकारोव्हा हिच्याशी होईल. 

ड्रग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने शारापोवावर लादलेल्या बंदीचा कालावधी २६ एप्रिल रोजी संपुष्टात आला. त्यानंतर तिने स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेद्वारे पुनरागमन केले.

या स्पर्धेसाठी शारापोवाला 'वाईल्ड कार्ड'द्वारे प्रवेश देण्याच्या संयोजकांच्या निर्णयास पोलंडची टेनिसपटू ऍग्नीस्का रॅडवन्स्का हिने विरोध केला आहे.