पुण्यनगरीत ‘बाप्पा मोरया’चाच जयघोष

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे - ‘मोरया-मोरया’चा न थांबणारा जयघोष... जमेल त्या जागेवरून हे सगळं मोबाईलमध्ये टिपून घेण्याचा प्रयत्न करणारे गणेशभक्त... त्या सुहास्यवदना मूर्तीची एक झलक मिळावी, म्हणून त्या दिशेने डोळे लावून पाहणारा प्रत्येक जण आणि या सगळ्यांच्या सोबतीला आलेल्या सुखद वर्षाधारा... अशा दिमाखदार वातावरणात शुक्रवारी शहरात बाप्पांची मिरवणूक निघाली. घरगुती गणपतींसह मानाच्या गणपतींचीही विधिवत प्रतिष्ठापना झाली. दिवसभर पुण्यनगरीत ‘बाप्पा मोरया’चाच जयघोष सुरू होता. (सकाळ छायाचित्रसेवा)