सजावटीचे फोटो शेअर करा ‘सकाळ’कडे

Monday, 28 August 2017

घरगुती बाप्पांची आरास आणि सजावटही आता अतिशय कल्पकपणे केली जाऊ लागली आहे. या सजावटीला विविध सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आवश्‍यक संदेशांची झालरही आता लाभते आहे. तुमच्या पर्यावरणपूरक, कल्पक किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या आरास-सजावटीचे फोटो जगभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सकाळ’ने यंदा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यातील निवडक फोटोंना ‘सकाळ’मधून प्रसिद्धी दिली जाईल. त्याशिवाय, उमेदीच्या काळातील तुमच्या गणेशोत्सवातील आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोंसाठीही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध असणार आहे.

घरगुती बाप्पांची आरास आणि सजावटही आता अतिशय कल्पकपणे केली जाऊ लागली आहे. या सजावटीला विविध सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आवश्‍यक संदेशांची झालरही आता लाभते आहे. तुमच्या पर्यावरणपूरक, कल्पक किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या आरास-सजावटीचे फोटो जगभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सकाळ’ने यंदा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यातील निवडक फोटोंना ‘सकाळ’मधून प्रसिद्धी दिली जाईल. त्याशिवाय, उमेदीच्या काळातील तुमच्या गणेशोत्सवातील आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोंसाठीही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध असणार आहे. त्यातील काही निवडक छायाचित्रांना ‘सकाळ’मधून प्रसिद्धी दिली जाईल. तुमची सजावट आणि जुने फोटो व्हॉट्‌स ॲपच्या माध्यमातून शेअर करा या क्रमांकावर - ९१४६१९०१९१. 
१) तुमच्या मंडळांचे देखावे, मिरवणुकीचे किंवा उत्सवातील इतर आठवणी उलगडणारे किमान वीस वर्षांपूर्वीचे जुने फोटो पाठवता येतील. 
२) बाप्पा आता विराजमान झाले आहेत. घरगुती आरास आणि सजावटीचे फोटो पाठवायचे आहेत. फोटोसह नाव आणि संपूर्ण पत्ता आवश्‍यकच. 

www.facebook.com/kolhapursakal