गजरथ, सुवर्ण महल अन्‌ विद्युत रोषणाई

सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पिंपरी - चिंचवडगाव आणि चिंचवड स्टेशन परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या वर्षी गजरथ, नागपंचमी, सुवर्णमहल आणि विद्युत रोषणाई यांसारखे देखावे सादर केले आहेत. उर्वरित बहुतेक मंडळांचे देखावे अपूर्ण असून, येत्या दोन दिवसांत देखावे पूर्ण होणे अपेक्षित आहे.  

चिंचवडगाव
चिंचवडगावातील नवतरुण मंडळाचे यंदाचे ६४ वे वर्षे आहे. मंडळाने यंदा गजरथाचा देखावा केला आहे. उत्सवामध्ये महिलांच्या हस्ते श्रींची आरती केली जाणार आहे. अनुराग चिंचवडे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

चिंचवड गावठाणातील श्री काळभैरवनाथ मित्र मंडळ यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षे साजरे करत आहे. मंडळाने सुवर्णमहल साकारला असून रोज सायंकाळी भजन-कीर्तन व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मंगळवारी (ता. २९) शस्त्रास्त्र आणि मोडी लिपीचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महेश लांडगे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
तानाजीनगर येथील श्री शिवाजी उदय मंडळाचे यंदाचे ४५ वे वर्षे असून मंडळाने नागपंचमीचा हलता देखावा सादर केला आहे. देखाव्यात २२ हलत्या मूर्ती आहेत. मंडळाकडून वर्षभर क्रीडा उपक्रम राबविले जातात. तसेच मार्चमध्ये रक्तदान शिबिर घेतले जातात. राजाराम गावडे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

चिंचवड स्टेशन
चिंचवड स्टेशन येथील साईबाबा तरुण मंडळाने यंदा आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाचे यंदाचे ४० वे वर्षे असून मारुती पंद्री अध्यक्ष आहेत. वर्षभर मंडळाकडून विनामूल्य आरोग्य तपासणी, रक्तदान, अन्नदान शिबिर आदी उपक्रम घेतले जातात. चिंचवड स्टेशन येथील हनुमान तरुण मंडळाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मंडळाने जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन हा हलता देखावा सादर केला आहे. श्‍याम गावडे मंडळाचे अध्यक्ष असून रक्तदान शिबिर, निबंध लेखन, रांगोळी स्पर्धा यांसारखे उपक्रम घेतले जातात.