कोथरूडमध्ये जिवंत देखाव्यांवर भर

Wednesday, 30 August 2017

कोथरूड - कोथरूड, कर्वेनगर आणि एरंडवणे परिसरांतील मंडळांनी आपल्या लाडक्‍या गणरायासाठी दिमाखदार महाल, विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर केले आहेत. तसेच ऐतिहासिक, पौराणिक विषयांवरही जिवंत देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

या भागातील समस्त गावकरी मंडळाने यंदाच्या वर्षी ‘स्वामी समर्थ लीला’ हा अक्कलकोट स्वामींच्या लीलांवर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. यामध्ये अभिनय क्षेत्रातील कलाकारांकडून स्वामीं अवतारातील विविध विषय सादर करण्यात येत आहेत. हा देखावा स्वामीभक्तांसाठी उत्तम पर्वणी ठरत आहे.

कोथरूडमधील शास्त्रीनगर भागातील संगम तरुण मंडळाने ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा ऐतिहासिक जिवंत देखावा सादर केला आहे. गेल्या वीस वर्षांपासून संगम तरुण मंडळाच्या वतीने विविध ऐतिहासिक विषयांवर जिवंत देखावा सादर करण्यात येत आहे. या देखाव्यामध्ये झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या स्वातंत्र्यातील योगदान आणि लढाईवर आधारित प्रसंग सादर करण्यात येत आहेत.

कोथरूड भागातील हनुमान क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने तिरुपती बालाजीच्या स्वरूपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या गणेशमूर्तीला सोन्याच्या दागिन्यांनी सजविण्यात आले आहे. गुजरात कॉलनीमधील संयुक्त आझादनगर मित्र मंडळाच्या वतीने जिवंत विषयाला हात घालीत ‘पर्यावरण जनजागृती’ या विषयावर जिवंत देखावा सादर केला आहे. पुढील पन्नास वर्षांनंतर झाडे कमी झाल्याने घरातही ऑक्‍सिजनचे मास्क लावून फिरावे लागेल, असा आशयाचा हा देखावा आहे. 

कर्वेनगर भागातील अखिल श्रीमान परिसर मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक सजावट केली आहे. कर्वेनगरमधील विठ्ठल- रुक्‍मिणी सार्वजनिक मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. कर्वे रस्त्यावरील जयदीप मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. कर्वेनगरमधील विकास मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, गुलाबराव ताठे मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक सजावट केली आहे.