आकाशात रंगला अद्भूत सोहळा

Thursday, 1 February 2018

खग्रास चंद्रगहणाचा ब्लडमून,सुपरमून व ब्लुमूनचा त्रीवेनी संगम. 

दिग्रस - खगोलीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना बुधवारी ता.३१ जानेवारीला आकाशात घडली. माघ पोर्णिमा अर्थात बुधवार ता.३१ जानेवारी २०१८ रोजी दिवस व रात्रीचे मिलन होत असतांना सांजवेळी चंद्रोदय होताच क्षीतीजावर खग्रास चंद्रग्रहणाने ग्रसलेला तपकीरी चंद्र (ब्लडमून) दिसला. याचवेळी ग्रहण सुटताच सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून आला. या वेळी चंद्र पृथ्वीपासून नेहमी पेक्षा जवळ सुमारे ३ लाख ५८ हजार किलोमिटर अंतरावर आल्यामुळे नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी होता. 

अवकाशातील या अविस्मरणीय सोहळ्याचा अनेकांनी आनंद घेतला. दिग्रस (जिल्हा:यवतमाळ) येथील सकाळचे छायाचित्रकार रामदास पद्मावार यांनी टिपलेली आकाशात रंगलेल्या या अदभूत सोहळ्याची छायाचित्रे.