'हे' आहेत टीम इंडियातील राखेतून उभारी घेणारे 'फिनिक्स पक्षी'

अनेक दिग्गज वेगवेगळ्या कारणांनी मैदानापासून दूर राहिले लागले आहे.
7 Indian Cricketers
7 Indian Cricketers
Updated on

आयपीएल 2022 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा दिनेश कार्तिक तब्बल तीन वर्षांनी टीम इंडियात परत आला आहे. कार्तिक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसणार आहे. कार्तिक हा एकमेव खेळाडू नाही ज्याला दीर्घकाळ टीम इंडियाच्या बाहेर राहावे लागले आहे. अनेक दिग्गज वेगवेगळ्या कारणांनी मैदानापासून दूर राहिले लागले आहे.

२०११ च्या विश्वचषकाचा हिरो भारतीय अष्टपैलू युवराज सिंग कर्करोगामुळे जवळपास वर्षभर मैदानापासून दूर होता. तो पुन्हा कधीच खेळणार नाही असे वाटत होते. मात्र कॅन्सरशी लढाई जिंकून तो मैदानात परतला आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

सौरव गांगुलीचे 2005 मध्ये कर्णधारपदही जबरदस्तीने काढून घेतलं. एक वेळ अशी पण आली की त्याला संघातून वगळण्यात आले, पण सौरव गांगुलीने पुनरागमन करत सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले.

दिनेश कार्तिकने वयाच्या 37 व्या वर्षी टीम इंडियात पुनरागमन केले आणि काहीही अशक्य नाही हे सिद्ध केले. IPL 2022 मध्ये दिनेश कार्तिकने उत्कृष्ट फॉर्म दाखवत पुनरागमन केले.

रवींद्र जडेजा पण दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर राहिला होता. मोकळ्या वेळेत त्याने आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आणि त्याच्या कामगिरीमुळे परत संघात स्थान मिळवले. टीम इंडियाकडून खेळताना आता जडेजा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनला आहे.

वयाच्या 30 व्या वर्षी खांद्याच्या दुखापतीने अनिल कुंबळेच्या कारकिर्दीला ब्रेक लावला होता, पण तो मैदानात परतला आणि आणखी बरीच वर्षे भारतासाठी खेळला. त्याच्या गोलंदाजीमुळे त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे.

 हार्दिक पांड्याला पाठीच्या दुखापतीमुळे काही काळ टीम इंडियातून वगळण्यात आले होते. त्याच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित केले जात होते. पण त्याने आयपीएल 2022 मध्ये स्वत:ला सिद्ध केले.

आशिष नेहरा दुखापतीमुळे ४ वर्षे संघाबाहेर होता. खडतर संघर्षानंतर तो परतला आणि 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com