Maharashtra Politics:गोव्यातील ज्या ताज हॉटेलमध्ये आमदार थांबणार, त्याचा थाट निराळाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोव्यातील ज्या ताज हॉटेलमध्ये बंडखोर आमदार थांबणार, त्याचा थाट निराळाच

Shinde Group is goiung to stay in  Taj Resort & Convention Centre, Goa
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. उद्या बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाविरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आदेश बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करत ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत, कारण 16 बंडखोर आमदारांनी त्यांच्या संभाव्य अपात्रतेवर अद्याप निर्णय दिलेली नाही. सांगितल्यानंतर राज्यपालांनी संख्याबळ चाचणीचे आदेश दिले आहेत.

गुवाहाटीच्या एवढ्या दिवसाच्या मुक्कामानंतर आता बंडखोर आमदारांचा पुढला मुक्काम गोव्यात असणार आहे.

रेडिसन ब्लू च्या शाही सुविधांच्या उपभोगानंतर एकनाथ शिंदेंबरोबर या बंडखोर आमदारांनी त्यांचा मुक्काम गोव्याकडे वळवलाय.

गोव्यातील 'ताज हॉटेल आणि कनवेंशन सेंटर' येथे या बंडखोर आमदारांचा पुढला मुक्कामपोस्ट असणार असणार आहे.

या हॉटेलची चकाकी निराळीच आहे.ती बघून बंडखोर आमदार नक्कीच खूश होणार आहेत.उद्याच्या निकालासाठी हे सगळे मुंबईला रवाना होणार आहेत.

केवळ काही तासांकरिता राहाण्यासाठी या बंडखोर आमदारांना परत एकदा गुवाहाटीनंतर गोव्याच्या शाही हॉटेलात हालवण्यात आलं आहे.उद्या हे ५० बंडखोर आमदार गोव्याहून थेट मुंबईच्या विधान भवनात पोहोचणार आहेत.

go to top