उन्हाळ्याच्या दिवसांत बरेच पर्यटक एखाद्या थंड प्रदेशात धाव घेऊ पाहातात.पण आपल्या बॉलीवूड सेलिब्रेटिजचं मात्र तसं काही नसतं.ईच्छा होईल तेव्हा ही मंडळी त्यांना हव्या त्या ठिकाणी पोहोचते.आणि फोटोज पोस्ट करत असते.चाहत्यांची आवडती अभिनेत्री सारा अली खान सध्या काश्मीर वॅकेशनवर गेलेली दिसते.
प्रसिद्ध अभिनेत्रींचे बरेच फोटोज सोशल मीडियावर वायरल होत असतात.त्यांच्या देखण्या आणि मनमोहक अदांनी त्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.साराने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काश्मीरमधे काढलेले काही फोटोज पोस्ट केलेले दिसते.
साराने तीच्या या फोटोजला खास असे कॅप्शनही दिले आहे.तीने कॅप्शनमधे 'कश्मीर की कली, इज बॅक टु युवर गली, नाऊ ट्रेकिंग पर मै चली' असे लिहीले आहे.
सारा अली खानच्या या फोटोजमधे साराबरोबरच काश्मीरचे सुंदर आणि मनमोहक असे दृश्य या फोटोजमधे दिसतेय.त्यामुळे या फोटोजला भारी लाईक्सही मिळाले आहेत.
साराच्या एका फोटोमधे तंबूही दिसतोय.फोटोमधे कुठे सारा नदीच्या काठी दिसतेय तर कुठे ती काश्मीरच्या बर्फाळ दऱ्यांमधे दिसतेय.
साराच्या या इन्स्टाग्राम पोस्टला चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत.सारा तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला बरीच अॅक्टीव असते त्यामुळे तीचा फॉलोविंग वर्गही मोठा आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.