Photo : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा साखरपुडा.. राणा अंजलीचे खास फोटो..|akshaya deodhar and hardik joshi engaged | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा साखरपुडा.. राणा अंजलीचे खास फोटो..

akshaya deodhar and hardik joshi engaged

झी मराठी वरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या जीवनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी साकारलेल्या राणा आणि अंजली या पात्रांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही दोघं चर्चेत होते. पण त्यांच्या प्रेमाबाबत गोपनियता बाळगली गेली होती. साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत दोघांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. ( Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged)

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. हार्दिक आणि अक्षया यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती जोडी होती.

सध्या हार्दिक जोशी झी मराठी वरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे.

त्यांच्यातील नात्याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. त्यांचा साखरपुडा हा  चाहत्यांना सुखद धक्का आहे.

रिल लाईफ मधील हे कपल रीयल लाईफ मध्येही एकत्र आले आहेत. सध्या सोशल मिडियावर त्यांच्याच साखरपुड्याची चर्चा आहे.

या साखरपुड्यात सर्व विधी पार पडल्यानंतर 'राणादा'ने पाठकबाईंना खास रोमँटीक पद्धतीने अंगठी घालती. यावेळी त्यांनी वेस्टर्न लुक केला होता.

या साखरपुड्याला अभिनेत्री धनश्री कडगावकर आणि विणा जगताप यांनी हजेरी लावली होती.

यासह मालिका विश्वातील अनेक  कलाकार यावेळी उपस्थित होते. या नव्या जोडीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

go to top