sakal

बोलून बातमी शोधा

ढोल-ताशांच्या गजरानं कोल्हापूर दुमदुमलं; गणरायाच्या विसजर्न मिरवणुकीस सुरवात

श्रद्धा, भक्तीभाव मनी घेऊन आलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीस आज दिमाखात सुरुवात झाली आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मिरवणुकीतील मानाच्या तुकाराम माळी गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे पूजन झाले त्यानंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात पालखीतून गणेश विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे थांबलेला गणेशोत्सव यंदा नव्या उत्साहाने साजरा झाला. आज अनंत चतुर्दशी निमित्त निघालेली विसर्जन मिरवणूक गणेश भक्तांना आनंदाची पर्वणी ठरली आहे.

कोल्हापूर खासबाग मैदानापासून विसर्जन मिरवणूकीस सुरू झाली 
आहे.

कोल्हापूर खासबाग मैदानापासून विसर्जन मिरवणूकीस सुरू झाली आहे.

मिरवणुकीच्या उद्घाटन सोहळ्यास माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेंद्र बलकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पर्यावरण प्रेमी उदय गायकवाड, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, शिवसेनेचे विजय देवणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक दरवर्षी आनंद चतुर्थीला सुरू होते त्यानंतर तब्बल 24 तास मिरवणुकीत जल्लोष सुरू असतो.

अमाप उत्साहात भाविक मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात. यंदाही गुरुवारी मध्यरात्रीपासूनच अनेक गणेश मंडळांनी ट्रॅक्टर मिरवणूक मार्गाजवळ आणून लावले होते.

कार्यकर्ते रात्रभर जागून मिरवणुकीची तयारी जागेवरच करत होते. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणेश मिरवणुकीत मार्गस्थ झाला. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.

मंगळवार पेठकडून, बिंदू चौकातून, टेंबे रोड वरून काही येणारी मंडळे मिरवणुकीत स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाली.

दोन वर्षाच्या खंडानंतर गणेश उत्सव मिरवणूक होत असल्याने अनेक मंडळांच्या जल्लोषाला उधाण आले आहे. अनेकांनी अजस्त्र ध्वनी यंत्रणा तसेच लेसर किरण रंगीबेरंगी विद्युत झोत मिरवणुकीत आणले आहेत.

काही मंडळी सकाळपासूनच दणदणाट सुरू केला तर काही मंडळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिस्तबद्ध मिरवणूक काढण्याच्या तयारीत आहेत.

मिरवणुकील सुरुवात होऊन काही काळ झाला असला तरी सायंकाळी चारनंतर बहुतांशी मंडळी मिरवणूक मार्गात येतील भाविकांची गर्दी आणखी वाढेल असा अंदाज आहे.

पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त लावला असून ठिकठिकाणी थांबलेल्या मंडळांना मिरवणूक मार्गात प्रवेश देण्यासाठी पोलिस सज्ज आहेत.