sakal

बोलून बातमी शोधा

अंकिता लोखंडेचा पती आहे गडगंड श्रीमंत; करतो 'हे' काम

Ankita Lokhande, Vicky Jain

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) १४ डिसेंबर रोजी विकी जैनशी (Vicky Jain) लग्न केलं. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. एखाद्या मंदिराप्रमाणे लग्नाचं मंडप बांधण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले होते. अंकिताचा पती विकी जैन कोण आहे आणि तो काम काय करतो, याविषयी अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

विकीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याने जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून (JBIMS) एमबीए केलं.

छत्तीसगडमधील रायपूर इथं जन्मलेला विकी एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात.

एमबीएची पदवी पूर्ण केल्यानंतर विकीने त्याच्या कुटुंबाच्या व्यवसायात रस घेतला. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, विकी हा बिलासपूरमधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक आहे.

या ग्रुपचा कोळसा व्यापार, वॉशरी, लॉजिस्टिक, पॉवरप्लांट, रिअल इस्टेट आणि डायमंडमध्ये मोठा व्यवयास आहे. विकीचा कौटुंबिक व्यवसाय हा रिअल इस्टेटमध्येही पसरलेला आहे. महावीर बिल्डर्स अँड प्रमोटर्स असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे. शिवाय, बिलासपूरमध्ये जैन कुटुंबीयांचं फर्निचरचं शोरूमही असल्याचं वृत्त आहे.

विकीच्या कुटुंबाचा व्यवसाय शिक्षण क्षेत्रातही पसरला आहे. त्याचे वडील विनोद जैन हे बिलासपूरमधील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकी एक आहेत. ते प्री-स्कूलचेही गुंतवणूकदार आहेत असंही म्हटलं जातं.

विकी हा क्रीडाप्रेमी आहे आणि त्याच्या या क्षेत्रातील आवडीमुळे त्याने त्यातही गुंतवणूक केली आहे. तो बॉक्स क्रिकेट लीग (BCL) संघ, मुंबई टायगर्सचा सहमालक आहे. त्याचा मनोरंजन इंडस्ट्रीशीही संबंध आहे.

अंकिता लोखंडेचं मुंबई ३ बीएचकेचं घर आहे. नुकतंच तिने पतीसोबत मिळून मुंबईत ८ बीएचकेच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. हे दोघं लवकरच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत.

विकीला महागड्या गाड्यांचीही आवड आहे. लँड क्रूझर आणि मर्सिडीज-बेंझ हे त्याच्या कार कलेक्शनमध्ये आहेत.

तर अंकिताकडे जॅग्वार एक्सएफ आणि पोर्श 718 आहे.