बंडातात्या सातारा पोलिस ठाण्यात स्वतः हजर; शहरात कडेकोट बंदोबस्त I Bandatatya Karadkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंडातात्या सातारा पोलिस ठाण्यात स्वतः हजर; शहरात कडेकोट बंदोबस्त

Bandatatya Karadkar
सातारा : राज्य सरकारनं घेतलेल्या वाईन बाबतीतच्या निर्णयावर राज्यभरात आंदोलनं होत असताना साताऱ्यात बंडातात्यांनी खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षपार्ह विधान केल्यानंतर संतापाची लाट उसळली.

काल (गुरुवार) सातारा पोलिस ठाण्यात बंडातात्यांविरोधात एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हजर होण्यासाठी बंडातात्या स्वतः सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

गुरुवारी बंडातात्यांसह १२५ जणांवर साथरोग अधिनियमन ३ तसेच १८८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) व १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

बंडातात्या शुक्रवारी हजर होणार असल्याने सातारा शहर, सातारा तालुका पोलिस, आरसीपी पोलिसांची एक तुकडी पाचारण करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिस मुख्यालय रस्ता दुपारी १२.३० वाजता बंद करण्यात आला होता.

सुमारे दोनशे पोलिसांचा फौजफाटा असल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, आज सातारा पोलिस ठाण्यात बंडातात्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :SataraBandatatya Karadkar