वारंवार नखे तुटतात? 'या' पाच पदार्थांचा आहारात करा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Tips : वारंवार नखे तुटतात? 'या' पाच पदार्थांचा आहारात करा समावेश

Nails

स्त्रियांची नेहमीच एक तक्रार असते. माझी नखे (Nails)का तुटतात. काय करता येईल म्हणजे नखे तुटणार नाही. काय खावं असे प्रश्न अनेकांना पडतात. मग धावाधाव सुरु होते ते बाजारातील महागडे पदार्थ विकत घेण्याची. पैसे खर्च तर होतातच पण अनेकदा पदरी निराशा पडते. अशावेळी घरच्या घरी नियमित खाण्यात काही पदार्थांचा समावेश केला तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ (Food) नियमित खावेत.

केळी :
केळामध्ये बायोटिन घटक असतात. यामुळे केस मजबूत होतात. याचा फायदा नखे तुटत नाहीत. याशिवाय नखांची वाढ होण्यास मदत होते. यामुळे केळीचा दैनंदिन वापर आहारात करा.

केळी : केळामध्ये बायोटिन घटक असतात. यामुळे केस मजबूत होतात. याचा फायदा नखे तुटत नाहीत. याशिवाय नखांची वाढ होण्यास मदत होते. यामुळे केळीचा दैनंदिन वापर आहारात करा.

टोमॅटो :
शरीरीत जर लोह आणि व्हिटॅमिन सी याचे प्रमाण खूप कमी असेल तरीही नखे लवकर तुटतात. यासाठी आहारात पालेभाज्या यांचा समावेश कराच शिवाय टोमॅटोचाही समावेश करा. यामध्ये टोमॅटो सूप, सॅलड खाऊ शकता.

टोमॅटो : शरीरीत जर लोह आणि व्हिटॅमिन सी याचे प्रमाण खूप कमी असेल तरीही नखे लवकर तुटतात. यासाठी आहारात पालेभाज्या यांचा समावेश कराच शिवाय टोमॅटोचाही समावेश करा. यामध्ये टोमॅटो सूप, सॅलड खाऊ शकता.

अक्रोड :
अक्रोडमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असते. अक्रोड नखांची गुणवत्ता सुधारण्याचे काम करतात. याच बरोबर अक्रोडचे आरोग्यासाठी इतर अनेक प्रकारे फायदे आहेत. त्यामुळे नियमित आहारात अक्रोडचा समावेश करा.

अक्रोड : अक्रोडमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असते. अक्रोड नखांची गुणवत्ता सुधारण्याचे काम करतात. याच बरोबर अक्रोडचे आरोग्यासाठी इतर अनेक प्रकारे फायदे आहेत. त्यामुळे नियमित आहारात अक्रोडचा समावेश करा.

पालक :
पालकमध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी असते.याचबरोबर यामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. पालक खाल्याने नखांची चांगली वाढ होते.

पालक : पालकमध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी असते.याचबरोबर यामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. पालक खाल्याने नखांची चांगली वाढ होते.

अंडी :
केळाप्रमाणेच अंड्यांमध्येही भरपूर प्रमाणात बायोटिन असते. याशिवाय यात प्रथिने, ओमेगा ३ फॅटी अॅसिड
असते. याचा आरोग्यासाठी फायदा होतो. यामुळे नखांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

अंडी : केळाप्रमाणेच अंड्यांमध्येही भरपूर प्रमाणात बायोटिन असते. याशिवाय यात प्रथिने, ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. याचा आरोग्यासाठी फायदा होतो. यामुळे नखांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

go to top