PHOTO : कोकणात मासेमारीसाठी नौका सज्ज; हर्णै बंदरात मच्छिमारांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : कोकणात मासेमारीसाठी नौका सज्ज; हर्णै बंदरात मच्छिमारांची गर्दी

konkan

हर्णै : मासेमारी बंदी सोमवारपासून आज संपुष्टात आली असल्यामुळे हर्णै बंदरातील मासेमारी नौका समुद्रावर स्वार होण्यास सज्ज झाल्या आहेत. या बंदरातून ५० नौका आज मासेमारीचा मुहूर्त करणार असून, या नौका बंदरात सज्ज झाल्या आहेत. जयगड, आंजर्ले खाडीतील नौका खाडीतूनच मासेमारीसाठी जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.हर्णै बंदरात मासेमारीला जाण्यासाठी दाखल झालेल्या नौका

आंजर्ले खाडीतील काळकाई म्हणून असणाऱ्या ठिकाणच्या गेले दोन महिने या उभ्या असलेल्या नौका देखील उद्याच्या मुहूर्तावर मासेमारीला जाणार आहेत.

बर्फ कारखान्यामध्ये बर्फ नेण्यासाठी आलेला मच्छीमार बांधव गडबड करत आहेत.

अजूनही काही मच्छीमार नोकांच्या डागडुजीची कामं करत आहेत.

हर्णै बंदरात मासेमारीला जाण्यासाठी दाखल झालेल्या नौका

पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरण मासेमारीला पोषक आहे. त्यामुळे हर्णै बंदरातून किमान ५० नौका मासेमारीसाठी जाणार आहेत. नागपंचमीनंतर दोन हजारांहून अधिक नौका मासेमारीसाठी समुद्रात जाण्यासाठी सज्ज होत आहेत.

दापोली तालुक्यातील हर्णै सर्वांत मोठे बंदर आहे. येथे हंगामामध्ये आजूबाजूच्या गावांमधील मिळून ८०० ते ९००नौका मासेमारीसाठी येतात.

आंजर्ले खाडीतून मासेमारीला बाहेर पडताना मासेमारी नौका