घटस्फोटानंतर प्रेमात पडल्या; लग्न,लीव्हइन रीलेशनमध्ये रमल्या 'या' अभिनेत्री Bollywood Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घटस्फोटानंतर प्रेमात पडल्या; लग्न,लीव्हइन रीलेशनमध्ये रमल्या 'या' अभिनेत्री

Malika Arora to Kalki-  story of second love....
मलायका अरोरा(Malaika Arora)-अर्जुन कपूर
मलायका आणि अर्जुन बॉलीवूडची सगळ्यात प्रसिद्ध जोडी आहे. मलायका सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी होती. आपल्या लग्नाला १८ वर्ष झाल्यानंतर मलायका-अरबाजनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आता मलायका अर्जुन कपूरसोबत लिव्ह इन मध्ये राहते.

मलायका अरोरा(Malaika Arora)-अर्जुन कपूर मलायका आणि अर्जुन बॉलीवूडची सगळ्यात प्रसिद्ध जोडी आहे. मलायका सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी होती. आपल्या लग्नाला १८ वर्ष झाल्यानंतर मलायका-अरबाजनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आता मलायका अर्जुन कपूरसोबत लिव्ह इन मध्ये राहते.

रश्मी देसाई(Rashmi Desai)-अरहान
२०१२ मध्ये अभिनेत्री रश्मि देसाई आणि नंदीश नं लग्न केलं होतं. परंतु ४ वर्षातच हे दोघे विभक्त झाले. आता रश्मि आणि अरहान एकमेकांच्या खूप जवळ आहेत. आणि लिव्ह इनमध्ये राहत आहेत. पण यावर अधिकृतरित्या दोघांकडून बोललं गेलेलं नाही.

रश्मी देसाई(Rashmi Desai)-अरहान २०१२ मध्ये अभिनेत्री रश्मि देसाई आणि नंदीश नं लग्न केलं होतं. परंतु ४ वर्षातच हे दोघे विभक्त झाले. आता रश्मि आणि अरहान एकमेकांच्या खूप जवळ आहेत. आणि लिव्ह इनमध्ये राहत आहेत. पण यावर अधिकृतरित्या दोघांकडून बोललं गेलेलं नाही.

कल्कि-हर्षबर्ग
दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केल्यानंतर कल्कि खूप चर्चेत आली होती. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर कल्कि हर्षबर्गला डेट करत होती आणि लिव्ह इन मध्ये राहत होती. लग्न न करता कल्कि आणि हर्षबर्गने एका मुलीला जन्म दिला आहे.

कल्कि-हर्षबर्ग दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केल्यानंतर कल्कि खूप चर्चेत आली होती. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर कल्कि हर्षबर्गला डेट करत होती आणि लिव्ह इन मध्ये राहत होती. लग्न न करता कल्कि आणि हर्षबर्गने एका मुलीला जन्म दिला आहे.

काम्या पंजाबी-शलभ डांग
काम्या पंजाबीचं पहिलं लग्न हे बंटी नेगी सोबत झालं होतं. काम्या आणि बंटी नेगीला एक मुलगी आहे. जवळ-जवळ १० वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर काम्यानं शलभ डांग या दिल्ली स्थित बिझनेसमॅन सोबत दुसरं लग्न केलं. या लग्नाआधी काम्या आणि सलाम एकत्र लिव्ह इन मध्ये राहायचे. शलभचं पहिलं लग्न झालेलं असून त्यापासून त्याला एक मुलगी देखील आहे. आता काम्या आणि शलभच्या दोन्ही मुली त्यांच्यासोबत राहतात.

काम्या पंजाबी-शलभ डांग काम्या पंजाबीचं पहिलं लग्न हे बंटी नेगी सोबत झालं होतं. काम्या आणि बंटी नेगीला एक मुलगी आहे. जवळ-जवळ १० वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर काम्यानं शलभ डांग या दिल्ली स्थित बिझनेसमॅन सोबत दुसरं लग्न केलं. या लग्नाआधी काम्या आणि सलाम एकत्र लिव्ह इन मध्ये राहायचे. शलभचं पहिलं लग्न झालेलं असून त्यापासून त्याला एक मुलगी देखील आहे. आता काम्या आणि शलभच्या दोन्ही मुली त्यांच्यासोबत राहतात.

सोनाली कुलकर्णी-नचिकेत पंतवैद्य
मराठीसोबतच हिंदी आणि आतंरराष्ट्रीय दर्जाच्या सिनेमांतूनही झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचं पहिलं लग्न मराठी इंडस्ट्रीतील नामवंत नाट्यदिग्दर्शक चंद्रकातं कुलकर्णी यांच्यासोबत झालं होतं. पण लग्नाच्या काही वर्षातच हे दोघे विभक्त झाले. त्यानंतर सोनाली अभिनेता मकरंद देशपांडेसोबत काही काळ लीव्हइन मध्ये राहिली पण त्यांच्यात बिनसलं. आणि मग सोनालीन टि.व्ही इंडस्ट्रीतच मोठ्या हुद्दयावर असलेले नंचिकेत पंतवैद्य यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि त्यांना नऊ वर्षाची एक गोड मुलगी देखील आहे.

सोनाली कुलकर्णी-नचिकेत पंतवैद्य मराठीसोबतच हिंदी आणि आतंरराष्ट्रीय दर्जाच्या सिनेमांतूनही झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचं पहिलं लग्न मराठी इंडस्ट्रीतील नामवंत नाट्यदिग्दर्शक चंद्रकातं कुलकर्णी यांच्यासोबत झालं होतं. पण लग्नाच्या काही वर्षातच हे दोघे विभक्त झाले. त्यानंतर सोनाली अभिनेता मकरंद देशपांडेसोबत काही काळ लीव्हइन मध्ये राहिली पण त्यांच्यात बिनसलं. आणि मग सोनालीन टि.व्ही इंडस्ट्रीतच मोठ्या हुद्दयावर असलेले नंचिकेत पंतवैद्य यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि त्यांना नऊ वर्षाची एक गोड मुलगी देखील आहे.

अभिज्ञा भावे-मेहूल पै
मराठी-हिंदी टी.व्ही इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलेल्या अभिज्ञा भावेचं पहिलं लग्न 2014 साली वरुण वटिटकरशी झालं होतं. पण संसारातील वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी तीन वर्षातच विभक्त होण्याचं ठरवलं. त्यानंतर इव्हेंट कंपनीचा मालक असलेल्या मेहूल पै सोबत प्रेमात पडून अभिज्ञानं दुसरं लग्न केलं. २०१९ मध्ये अभिज्ञानं मेहूलसोबत लग्नगाठ बांधली.

अभिज्ञा भावे-मेहूल पै मराठी-हिंदी टी.व्ही इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलेल्या अभिज्ञा भावेचं पहिलं लग्न 2014 साली वरुण वटिटकरशी झालं होतं. पण संसारातील वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी तीन वर्षातच विभक्त होण्याचं ठरवलं. त्यानंतर इव्हेंट कंपनीचा मालक असलेल्या मेहूल पै सोबत प्रेमात पडून अभिज्ञानं दुसरं लग्न केलं. २०१९ मध्ये अभिज्ञानं मेहूलसोबत लग्नगाठ बांधली.

go to top