sakal

बोलून बातमी शोधा

Celebrity wedding Photo: आलिया हसली, हंसिका रडली! सेलिब्रेटींच्या लग्नाचा अल्बम पाहिला का?

Year Ender 2022
बॉलीवूड ते दक्षिण चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणा-या हंसिका मोटवानीने 4 डिसेंबर 2022 रोजी जयपूरमधील अरवली पर्वतरांगांच्या मधोमध असलेल्या मुंडोटा किल्ल्यावर सोहेल कथुरियाशी शाही पद्धतीने लग्न केले. दोघांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध टीव्ही मालिका नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉयने 27 जानेवारी 2022 रोजी गोव्यातील हिल्टन गोवा रिसॉर्टमध्ये व्यापारी सूरज नांबियारशी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. मौनी रॉयची मैत्रिण आणि अभिनेत्री मंदिरा बेदीनेही या लग्नाला हजेरी लावली होती.

 अभिनेता विक्रांत मॅसीने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण शीतल ठाकूरसोबत हिमाचल प्रदेशमध्ये १८ फेब्रुवारीला लग्न केले. दोघे 2015 पासून एकमेकांना डेट करत होते.

अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने वरुण बंगेरासोबत ५ फेब्रुवारीला मुंबईत सात फेरे घेतले. करिश्माने रिअल इस्टेट गुंतवणूकदार वरुण बंगेराशी गुजराती आणि दक्षिण भारतीय रितीरिवाजांनी लग्न केले. या खास दिवशी पेस्टल गुलाबी लेहेंग्यात करिश्मा तन्ना अतिशय सुंदर दिसत होती.

अभिनेता फरहान अख्तरने शिबानी दांडेकरसोबत १९ फेब्रुवारीला मुंबईतील खंडाळा येथील सुकून फार्महाऊसमध्ये लग्न केले. या लग्नात दोघांचे जवळचे मित्र आणि नातेवाईकच सहभागी झाले होते. शिबानी आणि फरहान अख्तर 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

अभिनेत्री नयनताराने 9 जून 2022 रोजी चेन्नईमध्ये दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी लग्न केले. नयनताराच्या लग्नाला शाहरुख खाननेही हजेरी लावली होती. नयनताराने लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती. विशेष म्हणजे नयनतारा आणि विघ्नेश देखील यावर्षी 2 मुलांचे पालक बनले आहेत.

अभिनेत्री पायल रोहतगीने जुलैमध्ये तिचा बॉयफ्रेंड कुस्तीपटू संग्राम सिंगसोबत सात लग्न केले. दोघेही जवळपास 12 वर्षे एकमेकांना डेट करत होते.

अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल हे या वर्षी ऑक्टोबरमध्ये विवाहबद्ध झाले. दोघांनी अबू जानी आणि संदीप खोसला यांचे पोशाख कॅरी केले होते. ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाला कुटुंबीयांसह जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती.

 आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची अनेक वर्षांपासून चाहते वाट पाहत होते जे या वर्षी ते पार पडलं. आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल रोजी त्यांच्या घरी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. यावेळी आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत होती.