sakal

बोलून बातमी शोधा

बंजी जंपिग करायचंय? या ठिकाणांना भेट द्या 

bunjee

आता स्रर्व पर्यटन स्थळ सुरू झाल्याने लोकांनी विविध ठिकाणी जाण्याचे प्लॅनिंग सुरू केले आहे. आपल्या शहरापासून जवळ पण निसर्गरम्य ठिकाणी जाण्याकडे लोकांचा ओढा आहे पण फिरायला जायचं तर काहीतर वेगळं एडव्हेंचरस करायचं, असंही आता अनेकांन वाटतं. त्यामुळे अशा एडव्हेंचर ट्रिप्स प्लॅन केल्या जात आहेत. मुंबई, पुण्याजवळ तसेच भारतातील काही ठिकाणी बंजी जंपिग टूर केल्या जातात. जेथे तुम्ही मित्र-मैत्रीणींसोबत जाऊ शकता. असा थरार अनुभवायचा असेल तर शक्यतो लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना नेऊ नये.

लोणावळा : 
मुंबई- पुण्यापासून जवळ असलेल्या लोणावळ्यात अशी ट्रीप प्लॅन करता येऊ शकते. येथे दरवर्षी अनेक लोक बंजी जंपिंग करायला येतात. चार ते पाच मिनिटाच्या एका जंपचे शुल्क 1500 रूपये आहे.

लोणावळा : मुंबई- पुण्यापासून जवळ असलेल्या लोणावळ्यात अशी ट्रीप प्लॅन करता येऊ शकते. येथे दरवर्षी अनेक लोक बंजी जंपिंग करायला येतात. चार ते पाच मिनिटाच्या एका जंपचे शुल्क 1500 रूपये आहे.

गोवा:
बीचेस आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध असलेले गोवा बंजी जंपिंग साठीही तितकेच फेमस आहे. अंजुना बीचवर येथे 35 मीटर उंचावरून उडी मारायची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी प्रतिव्यक्ती चार ते सहा हजार रूपये शुल्क आकारले जाते.

गोवा: बीचेस आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध असलेले गोवा बंजी जंपिंग साठीही तितकेच फेमस आहे. अंजुना बीचवर येथे 35 मीटर उंचावरून उडी मारायची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी प्रतिव्यक्ती चार ते सहा हजार रूपये शुल्क आकारले जाते.

ऋषिकेश: कॅंपिंग, रिव्हर राफ्टींगसाठी प्रसिद्झ असलेल्या ऋषिकेशमध्ये बंजि जंपिगासाठीही सोय आहे. येथील मोहनचट्टी गावामाध्ये 83 मीटर उंचीवरून हा थरारक अनुभव घेण्याचे शुल्क प्रति माणशी 3500 रूयये आहे. तर काही ठिकाणी दीड ते दोन हजार रूपये शुल्क आकारले जाते. 

बंगलोर:
आयटी कंपन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बंगलोरमध्ये बंजी जंपिंग क्रेनद्वारे केले जाते.80 ते 130 फुट उंचावरून हा प्रकार केला जातो. त्यामुळे ज्यांना साहस करण्याची भिती वाटत नाही ते येथे भेट देतात. इथले शुल्क नेहमी बदलत असते.

बंगलोर: आयटी कंपन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बंगलोरमध्ये बंजी जंपिंग क्रेनद्वारे केले जाते.80 ते 130 फुट उंचावरून हा प्रकार केला जातो. त्यामुळे ज्यांना साहस करण्याची भिती वाटत नाही ते येथे भेट देतात. इथले शुल्क नेहमी बदलत असते.

दिल्ली : दिल्लीमध्येही तुम्ही बंजी जंपिगचा आनंद घेऊ शकता.वंडरलस्ट येथे 130 फूट उंचावरून क्रेनच्या सहायाय्याने हे साहस करता येते. येथील शुल्क दोन ते अडीच हजार असून 12 ते 55 वयोगटातील लोकही बंजी जंपिग करू शकतात. 