esakal | कोरोनानंतर बदलला पर्यटनाचा ट्रेंड; कौटुंबिक सहलींना वाढला प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

monsoon picnic

कोरोनानंतर बदलला पर्यटनाचा ट्रेंड; कौटुंबिक सहलींना वाढला प्रतिसाद

sakal_logo
By
खंडू मोरे

खामखेडा (जि. नाशिक) : कोरोनाकाळात सलग दीड वर्षे शासकीय निर्बंधामुळे अनेक परिवार आप्तस्वकियांपासून दूर राहिल्याने कंटाळलेले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना व पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक कुटुंबीय बाहेर जाण्याचे बेत आखत आहेत. पूर्वी पर्यटनाला जायचे म्हटले की आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या हॉटेल, रिसोर्टला पसंती दिली जात होती. त्या ट्रेंडमध्ये आता बदल झाला असून, आपल्याच भागातल्या जंगलातील, आडरानातील वाटा पर्यटकांना खुणावू लागल्या आहेत. कसमादेतील जंगल सफारी, किल्ले, धरण परिसरांतील कौटुंबिक सहलींना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.


कोरोनामुळे दोन वर्षांपासून लहान मुलांपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत सर्वच घरात बंदीस्त झाले होते. दुरावलेल्या परिवारांनी आता संयुक्तपणे पर्यटनाला जाण्याच्या योजना आखल्या जात आहेत. त्यादृष्टीने अनेक कुटुंबियांकडून तशी तयारी केली जात आहे. पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्याला अधिक पसंती देत असताना यानिमित्ताने परिवाराचे एक स्नेहमिलनही होऊ लागल्याने कौटुंबिक पर्यटन ग्रामीण भागातदेखील वाढू लागले आहे.

एकाच ठिकाणी सर्व परिवार एकत्र पर्यटन करत बिनधास्तपणे निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. कोरोनानंतर आपल्या भागापासून दूर फिरण्यापेक्षा परिवारासह एकत्रित राहण्याचा नवीन ट्रेंड यानिमित्ताने पुढे आला आहे. त्यामुळेच पावसाळ्याच्या सुटीनंतर पर्यटन सुरु होण्यापूर्वीच इतर निसर्ग पर्यटनाचे पर्याय उपलब्ध असताना या ठिकाणांपेक्षा स्थानिक पर्यटन केंद्रांवर यावर्षी गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: नांदगाव : सबवेचा पहिला बळी; रेल्वेखाली सापडून भाविक महिला ठार


कसमादेतील पर्यटनासाठीचे पर्याय

कळवण : सप्तशृंगगड, मार्कंडेय पर्वत, चणकापूर व पुनद धरण परिसर, रवळ्या जावळ्या, अहिवंत, अचलां, हतगड, मोहंदर, कणेरगड किल्ला व परिसर, भवानी धबधबा.
सटाणा : साल्लेर, मुल्लेर, हरणबारी, केळझर धरण, मांगीतुंगी, फुलपगार.
चांदवड : राजधेर, रेणुकामाता, चंद्रेश्‍वरी, धोडप किल्ला, वरदडी.
मालेगाव : गाळणा, गिरणा डॅम, गोरक्षनाथ गुहा.
देवळा : किशोरसागर धरण, घोड्याची अढी, देवदरेश्‍वर, चोरचावडी.

परिवारासह एकत्रित पर्यटनाने मानसिक थकवा कमी होतो. या काळात कुटुंबाचे स्नेहमिलन घडून येत असल्याने कोरोनाकाळात मनपरीहाराचा आनंद सहकुटुंबास उपभोगता येत आहे.
- पप्पू हिरे, देवळा

हेही वाचा: विमा कंपनीच्या नफेखोरीत अन्नदाता बेदखल

loading image
go to top