- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
फक्त नवनीत राणाच नव्हे; 'या' सेलिब्रिटींनीही घेतले 'लिलावती'त उपचार

खासदार नवनीत राणा यांनी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार घेणं सध्या रुग्णालयाला महागात पडणार असं दिसतंय. त्यांचा MRI करत असतानाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं आहे. अशा ठिकाणी फोटो काढण्यास परवानगी कशी दिली, यासह अनेक प्रश्न शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला विचारले आहेत. यानिमित्त जाणून घ्या लिलावती रुग्णालयात उपचार घेतलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींबाबत...

बाळासाहेब ठाकरे - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेही काही काळ या रुग्णालयात उपचार घेत होते. आपल्या शेवटच्या क्षणांवेळी ते याच रुग्णालयात होते.

उद्धव ठाकरे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे हेही काही दिवसांपूर्वी मणक्याच्या विकाराने त्रस्त होते. त्यांनीही लिलावती रुग्णालयातच उपचार घेतले.

संजय राऊत - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अँजिओप्लास्टी लिलावती रुग्णालयातच झाली. त्यावेळी काही काळ ते इथे उपचार घेत होते.

दिलीप कुमार - अभिनेते दिलीप कुमार आपल्या शेवटच्या काळात लिलावती रुग्णालयातच उपचार घेत होते.

अमिताभ बच्चन - बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनही बऱ्याचदा लिलावती रुग्णालयात नियमित तपासणीसाठी येत असतात. काही वर्षांपूर्वी त्यांना मणक्याचा त्रास झाल्यावर ते रुग्णालयात दाखल झाले होते.

2020 साली जेव्हा अभिनेता संजय दत्तला श्वसनाचा त्रास होत होता, त्यावेळी त्याला लिलावती रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.