ऑफमध्ये (Play Off) जागा मिळवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. दरम्यान, यंदाच्या हंगामात पाचवेळीची विजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चार वेळा आयपीएलवर नाव करणारी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेले आहेत. मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका गणिती समिकरणानुसार चेन्नई सुपर किंग्जला अजूनही प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी आहे. ही संधी 9 मे पर्यंतच्या निकालावर आधारित 32,768 विजयाची समिकरणं (Combination) तयार करण्यात आली आहे. रविवारच्या सामन्यानंतर हा आकडा 1,31,072 वर गेला. टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्यांनी प्रत्येक शक्यता पडताळून पाहिले आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला प्ले ऑफ गाठण्यासाठी किती संधी आहे याचा अंदाज बांधण्यात आला आहे. प्रत्येक संघाची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता किती हे पुढील प्रमाणे :
मुंबई इंडियन्स प्ले ऑफमधून आधीच बाहेर गेली आहे. मात्र त्यांना आपला सर्व सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर पाचव्या स्थानापर्यंत उडी मारता येईल.
चेन्नई सुपर किंग्जला दिल्लीविरूद्धच्या रविवारच्या विजयानंतर संयुक्तरित्या चौथ्या स्थान गाठण्याची 3.4 टक्के संधी आहे. जर त्यांनी पुढचे तीनही सामने जिंकले तर ही संधी असेल. चेन्नईला संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर पोहचण्याची 0.3 टक्के संधी आहे. त्यासाठी चार ते सात संघ 14 गुणांवर असले पाहिजेत.
केकेआरची प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी रविवारच्या सामन्यानंतर 2.9 टक्क्यापर्यंत संधी आहे. त्यांना संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर पोहचण्याची 0.2 टक्केच संधी आहे. त्यासाठी देखील चार ते सात संघात गुणांच्या बाबतीत टाय होणे गरजेचे आहे.
पंजाबला चौथ्या, तिसऱ्या आणि संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर देखील जाण्यासाठी 25 टक्के संधी आहे. मात्र त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची कोणतीही संधी नाही.
रविवारच्या पराभवानंतर सनराईजर्स हैदराबादचे पहिल्या चार संघात स्थान मिळवण्याची टक्केवारी 42.5 वरून 21.2 टक्क्यापर्यंत खाली आली आहे.
दिल्ली चेन्नईकडून पराभूत झाल्यानंतर त्यांचे देखील पहिल्या चारमध्ये जाण्यासाठीची शक्यता टक्केवारी 41.4 टक्क्यांवरून 23 टक्क्यांपर्यंत खाली आली आहेत.
रविवारी सनराईजर्स हैराबादला पराभूत केल्यानंतर रॉयल चॅलेंजर बेंगलोरची टॉप फोरमध्ये जाण्याची शक्यता 63 टक्क्यांवरून 89.6 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
रविवारच्या निकालानंतर राजस्थान रॉयल्सची देखील पहिल्या चार संघात स्थान मिळवण्याची शक्यता 93.8 टक्क्यांवरून 95.9 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
गुजरात ही सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र प्ले ऑफमधील त्यांच्या स्थानाला कोणताही धोका नाही.
गुजरात पाठोपाठ लखनौ ही यंदाच्या हंगामातील दुसरी नवखी टीम आहे. लखनौने देखील प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. जरी या दोन्ही संघांनी आपल्या पुढचे सगळे सामने गमावले तरी ते पहिल्या चार संघात असणार आहेत. फक्त चौथ्या स्थानासाठी टाय झाले तर अवघड होणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.