PHOTO : नायगावात सावित्रीबाई फुलेंना CM शिंदे, छगन भुजबळांकडून अभिवादन; 'क्रांतीज्योती'च्या कार्याचं कौतुक
नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलं.
Savitribai Phule Jayanti : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं.
त्यामुळं हीच आपली दैवत असून त्यांचे विचार समाजात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणं ही आपली जबाबदारी असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सातारा जिल्ह्यात केलें.
दरम्यान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलं.
छगन भुजबळ यांच्या हस्ते आज खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील सावता माळी समाज मंदिर बाजारपेठ इथं महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण झालं.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, हजारो वर्ष बहुजन समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होता. तत्कालीन व्यवस्थेकडून त्यांच्यावर खूप अन्याय व अत्याचार झाले. फोटो - अशपाक पटेल