मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर मुंबईतील काही ठिकाणी भेटी दिल्या. मुंबईतील हुतात्मा स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक अशा विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आहेत.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त महाराष्ट्र स्मारकाला भेट दिली.
यावेळी तेथे असलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला त्यांनी वंदन केले.
याबरोबर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
काल नव्या सरकारची बहुमत चाचणी पार पडली. यामध्ये शिंदे फडणवीस सरकारने बाजी मारली आहे.
त्याचबरोबर रविवारी भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
विरोधीपक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मागील १५ दिवसांतील नाट्यानंतर राजकीय वातावरण स्थिर झाले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.