पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न घालता फिरताना दिसलेल्या नागरिकांवर केली कारवाई

Wednesday, 9 September 2020

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असताना काही बेजबाबदार नागरिक मास्क न घालता रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. ते नागरिक स्वतः बरोबर दुसऱ्यांचा जीवही धोक्यात घालत आहेत. शासनाने अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई चालू केली आहे. पकडल्यावर नागरिक खिशात असलेला मास्क काढून तोंडावर लावत आहेत व पोलीसांना सोडण्यासाठी विनवणी करताना दिसत आहे. काळेवाडी एमएम शाळेजवळ पोलीस व पालिकेच्या "ब" क्षेत्रीय कार्यालयामार्फत संयुक्तरित्या ही कारवाई सुरु असतानाची ही दृश्य. (संतोष हांडे)

Edited By - Prashant Patil