Welcome 2021 : फर्ग्युसन रस्त्याकडे यंदा पुणेकरांनी फिरवली पाठ!

Thursday, 31 December 2020

पुणे : कोरोनाची दहशत असतानाही अनेक पुणेकर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडले होते. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी खूप कमी असल्याचे आढळले. तसेच हॉटेलमध्येही तुरळक गर्दी दिसून आली. 

पुणे शहर पोलिस आणि वाहतूक पोलिस नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करताना दिसून आले. तसेच रस्त्यावर जास्त वेळ रेंगाळत बसू नये असेही आवाहन करत होते. हॉटेल व्यावसायिक, किरकोळ विक्रेते आणि फुगे विक्रेत्यांना याचा फटका बसला आहे. काही नागरिक सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कच्या नियमाचे पालन करत होते, तर काहीजण पोलिस दिसताच मास्क तोंडाला लावत असल्याचे आढळून आले. हुल्लडबाजी करणारे यंदा बाहेर पडले नाहीत. 

Welcome 2021 : न्यूझीलंडमध्ये झालं नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत; पाहा व्हिडिओ!

हॉटेलमधून पार्सल घेऊन जाण्याकडे पुणेकरांचा कल आढळून आला. तर ऐरवी गर्दीने फुलून जाणारा फर्ग्युसन रोडवर बलून विक्रेते जास्त आणि त्या प्रमाणात नागरिक कमी असल्याचे आढळून आले.

दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी फार्म हाऊस, रिसॉर्ट अशा ठिकाणी मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे अशा पार्ट्यांच्या आयोजनावर मर्यादा आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)