New_Zealand
New_Zealand

Welcome 2021 : न्यूझीलंडमध्ये झालं नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत; पाहा व्हिडिओ!

ऑकलंड (न्यूझीलंड) : २०२० या पूर्ण वर्षामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. जगभरातील जवळपास सर्वच देशांना याचा सामना करावा लागला. अनेक कटू आठवणी मनात ठेवत या सरत्या वर्षाला निरोप देत येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. 

न्यूझीलंडमध्येही २०२१ या नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात आणि फटाकांच्या आतषबाजीत करण्यात आलं. न्यूझीलंडमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या ऑकलंडमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. कोरोना व्हायरसचा प्रभावीपणे सामना केलेल्या किवीजनी २०२१चे जोरदार स्वागत केले.

ऑकलंडमधील स्काय टॉवर याठिकाणी फटाके आणि लेसर शोद्वारे नववर्षाचे स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांनी हे नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यात साठवून घेतले. अनेक नागरिक संध्याकाळपासूनच येथील जगप्रसिद्ध हार्बर ब्रिज परिसरात जमा व्हायला लागले होते. याठिकाणी नेत्रदीपक अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसं पाहिलं तर दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेट असलेल्या सामोआ याठिकाणी सर्वात आधी नववर्षाचे स्वागत होते त्यानंतर न्यूझीलंडचा नंबर लागतो. 

सहसा लंडनमध्ये जगातील सर्वात मोठी आतषबाजी केली जाते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमधील करोडो लोक आता कडक निर्बंध असल्याने घरी बसूनच नव्या वर्षाचं स्वागत करतील. त्यामुळे थेम्स नदीच्या काठी यावेळेस शांतता पाहायला मिळणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लोकांना मोठ्या संख्येत जमा होण्यास आणि फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत एकदम वेगळ्या पद्धतीने झाल्याचेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. युकेमध्ये पार्टी करण्यावर पोलिस आणि सरकारने निर्बंध लादले आहेत.

दरम्यान, २०२० या संपूर्ण वर्षात कोरोनामुळे अनेकांनी आपले आप्तस्वकीय, जवळची माणसं गमावली. काहींचा जॉब गेला, तर काहींना आर्थिक तसेच इतर गोष्टींचा सामना करावा लागला. मात्र तरीही या सर्वांचा सामना करत आणि झाल्या गोष्टींना विसरून जात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. येणारं २०२१ या वर्षाकडे सर्वचजण आशेने पाहत आहेत. या वर्षात कोरोनाला हरवत नवी विजयी घोडदौड करण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com