संक्रांतीनिमित्त बाजारात गर्दी...

जिंतुरात कोरोना नियमांचे उल्लंघन ; मास्कचाही वापर दिसेना
makarsankrant
makarsankrantesakal
Updated on

दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. (छायाचित्र - योगेश गौतम)

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाणांच्या वस्तूंनी शहरातील बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी ग्राहकांची विशेषतः महिलांची गर्दी होत आहे.
अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाणांच्या वस्तूंनी शहरातील बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी ग्राहकांची विशेषतः महिलांची गर्दी होत आहे.sakal
मकरसंक्रांत हा पौष महिन्यात १४ जानेवारीला येणारा हा महिलांसाठी महत्वाचा समजला जातो तसेच शेती संबंधितही या सणाला महत्त्व आहे.
मकरसंक्रांत हा पौष महिन्यात १४ जानेवारीला येणारा हा महिलांसाठी महत्वाचा समजला जातो तसेच शेती संबंधितही या सणाला महत्त्व आहे. sakal
येथे आठवडी बाजार असल्याने मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान या सणासाठी गर्दी होत असताना नागरिक कोरोना नियमांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे. 
अनेक नागरिक मास्कचाही वापर करत नसल्याचे चित्र जिंतूरच्या बाजारपेठेत आहे.
येथे आठवडी बाजार असल्याने मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान या सणासाठी गर्दी होत असताना नागरिक कोरोना नियमांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे. अनेक नागरिक मास्कचाही वापर करत नसल्याचे चित्र जिंतूरच्या बाजारपेठेत आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी नवनवीन दागिने, वस्त्रालंकार परिधान मातीच्या हळदी कुंकू लावून, दोऱ्याने सुतवून त्यामध्ये, गाजर, बोरं, हरभऱ्याची घाटे, ऊसाची पेरे, बिब्याची फुले दाळ, तांदूळ इत्यादी वस्तू भरून देवापुढे व तुळशी जवळ ठेवून सुवासिनींना वसा देतात, एकमेकींना तीळगूळ देऊन शुभेच्छा देतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी नवनवीन दागिने, वस्त्रालंकार परिधान मातीच्या हळदी कुंकू लावून, दोऱ्याने सुतवून त्यामध्ये, गाजर, बोरं, हरभऱ्याची घाटे, ऊसाची पेरे, बिब्याची फुले दाळ, तांदूळ इत्यादी वस्तू भरून देवापुढे व तुळशी जवळ ठेवून सुवासिनींना वसा देतात, एकमेकींना तीळगूळ देऊन शुभेच्छा देतात. sakal
आबालवृद्ध  नागरिक देखील स्नेहभाव वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने एकमेकांना तीळगूळ देऊन  मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याची प्रथा आहे.
आबालवृद्ध नागरिक देखील स्नेहभाव वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने एकमेकांना तीळगूळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. sakal
अशा या पावन सणानिमित्त शहरात मध्यवर्ती चौक, पोलिस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मंडई, येलदरी रोड परिसरातील रस्त्यावर सुगडी, हळदीकुंकू, विविध रंगांची रांगोळी, बिब्याची फुले, ऊस, हरभऱ्याची डहाळी, वाळूक, काकडी, हलव्याचे काटेरी तीळ, वाण देण्यासाठी लागणाऱ्या नाना वस्तूंच्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.
अशा या पावन सणानिमित्त शहरात मध्यवर्ती चौक, पोलिस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मंडई, येलदरी रोड परिसरातील रस्त्यावर सुगडी, हळदीकुंकू, विविध रंगांची रांगोळी, बिब्याची फुले, ऊस, हरभऱ्याची डहाळी, वाळूक, काकडी, हलव्याचे काटेरी तीळ, वाण देण्यासाठी लागणाऱ्या नाना वस्तूंच्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com