
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने हाॅलीवूडमध्ये जोरदार पदार्पण केले आहे. त्याच्या द ग्रे मॅन चित्रपटाचे चौहूबाजूंनी चर्चा सुरु आहे. अॅव्हेंजर्सचे दिग्दर्शक जो आणि अँथनी रुसो यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात धनुष खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. देश-विदेशात त्यांच्या अभिनयाचे कौतूक होत आहे. आम्ही तुम्हाला धनुष विषयी ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्याबाबत सांगणार आहोत.त्यानंतर त्याने अनेक सर्वोत्तम तामिळ आणि मग तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. २०१२ मध्ये धनुष व्हाय दिस कोलाव्हरी डी गाण गाऊन देशभरात खळबळ माजवून दिले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने चित्रपट रांझणामध्ये सोनम कपूरबरोबर काम केले. या चित्रपटात धनुषचे काम अप्रतिम होते. देशभरात त्याचे कौतुक झाले.