बारामती : दिवाळी सर्वांसाठी महत्त्वाची असते. गरिबांपासून श्रीमंतांच्या घरी आनंद घेऊन येते. तसेच भाऊबीजही तितकीच महत्त्वाची असते. भाऊ-बहिणीच्या प्रवित्र नात्याचा हा सण आहे. राजकारणात नेत्यांना वेळ मिळत नाही, हे खरं आहे. मात्र, भाऊबिजेसाठी कोणीही वेळ काढतो. व्यस्त राजकारणातून, व्यवसायातून वेळ काढत पवार कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांनी एकत्र दिवाळी साजरी केली. त्याचेच हे खास फोटो...
भाऊबीज निमित्त शरद पवार यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले.
भाऊबीज निमित्त बारामतीतल्या अजित पवारांच्या घरी मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी झाली. यावेळी तीन पिढ्या एकत्र आल्या होत्या.
आमदार रोहित पवार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची भाऊबीजही बारामतीत साजरी झाली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे औक्षण केले.
शरद पवार आणि बंधू प्रतापराव पवार यांचे बहीण मिनाताई जगधने यांनी औक्षण केले. त्यानंतर अजित पवार यांची ओवाळणी झाली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाऊ अजित पवार आणि राजेंद्र पवार यांचे औक्षण केले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.