कभी खुशी कभी गम या चित्रपटातील देखणा बालकलाकार अनेकांना आजही आठवत असेल.आता हा बालकलाकार तरूण झाला असून 'ईश्क विश्कच्या' सिक्वेलमधे झळकणार आहे.२००३ मधे प्रदर्शित झालेल्या ईश्क विश्क या चित्रपटाचा सिक्वेल पुढल्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.याच चित्रपटातून जिब्रान पुनरागमन करतोय.'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात जिब्रानने राहुल आणि अंजली यांचा मुलगा क्रिश रायचंदची भूमिका साकारली होती.
कभी खुशी कभी गम या चित्रपटात शाहरूख आणि काजोलसोबतच हृतिक रोशन.करीनी कपूर खानसोबतही सीन्स केले होते.
या चित्रपटानंतर त्याने इतरही काही बॉलीवुड चित्रपटांमधे काम केले होते.
'महाभारत' या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय भूमिका साकारणारे फिरोज खान हे जिब्रानचे वडिल आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.