- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
PHOTOS: पास करण्यासाठी घेतली लाच; शिक्षणमंत्र्याच्या घरात पैशांचा पाऊस

सक्तवसुली संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. चटर्जी यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ED ने शुक्रवारी रात्री टीएमसी पक्षाचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची मैत्रीण अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले.

यादरम्यान 20 कोटींहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने इत्यादी जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच छापेमारीत अनेक गुन्हे दाखले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेले हे पैसे एसएससी घोटाळ्याशी निगडीत असल्याचा संशय ईडीला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते

पश्चिम बंगाल सरकारच्या मंत्र्यांवर करण्यात येत असलेली ही संपूर्ण कारवाई शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली.

ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

यामध्ये नापास उमेदवार लाखो रुपयांची लाच देऊन उत्तीर्ण झाले. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.