शरीराच्या आरोग्यासाठी फळे फायदेशीर असतात. प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी अनेक फळे उपयोगी पडतात. दिवसातून किमान रोज एक फळ खावे असे अनेक डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सांगतात. कारण फळांतून पोषकतत्त्वे मिळतात. वजन कमी करणारे अनेकजण नेहमी फळांचे सेवन करतात. परंतु अनेकांनी फळे खाण्याच्या काही योग्य पद्धती माहित नसतात. त्यामुळे यातून मिळणाऱ्या लाभांपासून आपण दूर राहू शकतो. या आर्टीकलमध्ये फळे खाण्याची योग्य पद्धत आज आपण पाहणार आहोत.
जेवणाआधी तासभर आधी फळे खावीत
आहारतज्ज्ञांच्या मतानुसार, जेवण करण्याआधी किमान ३० मिनीट किंवा एक तास आधी कोणतही फळ खाल्लं पाहिजे. जेवण करण्याआधी तासभर तुम्ही एखाद्या फळाचे सेवन केले, तर ते आरोग्यासाठी फायद्याचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही फळे खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
जेवण करण्याआधीच फळ खाणे का महत्वाचे ?
जेवण करण्याआधी फळ खाल्ल्याने पचण्याची क्रिया सुधारते. त्यामुळे आहारतज्ज्ञ योग्य प्रमाणात ही फळे खाण्याचा सल्ला देतात. तुम्ही जेवणानंतर फळे खाणे ही कधीतरी शरीरासाठी अपायकारक ठरु शकते. यामुळे तुमचे वजनही कमी होण्यास समस्या निर्माण होतात.
एका दिवसात किती फळे खावीत ?
काही आहारतज्ज्ञ एका दिवसात किती फळे खावीत? यावर तीन फळे खाण्याचा सल्ला देतात. यापुढे जाऊन तुम्ही पाच फळेही खाऊ शकता.
कोणती फळे खावीत ?
शरीराला आरोग्यपूर्ण आणि तंदुरुस्त ठेवायचे असल्यास आहारात जैविक, मौसमी आणि स्थानिक फळे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे अनेक फायदे होतात.
फक्त फळांचा डाएट घेणे योग्य आहे का ?
जर तुम्ही फक्त फळांच्या डाएटवर अवलंबून राहत असाल तर ते फायद्याचे आहे. शिजवलेल्या अन्नामध्ये व्हिटामीन, मिनरल्स, फायबरचे प्रमाण अतिशय कमी असते. जेव्हा तुम्ही फळे खाता तेव्हा आपोआप तुमचे जेवण कमी येते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.