sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : शेतकऱ्याची कमाल! YouTube च्या मदतीने फळमाशीसाठी बनवला सापळा

राजापूर : सोशल मिडीयावर अनेकवेळा होत असलेल्या वादग्रस्त चर्चा आणि त्यातून उद्भवणार्‍या वादांमुळे सोशल मीडियाच्या वापराबाबत समाजामध्ये अनकवेळा नापसंती व्यक्त होत असल्याचे चित्र दिसते. मात्र, याच सोशल मिडीयाचा सदुपयोग करत शहरानजकीच्या शीळ येथील तरूण शेतकरी सुनिल काशिनाथ गोंडाळ यांनी पिकाची नासाडी करणार्‍या फळमाशीला प्रतिबंधित करणारा सापळा तयार केला आहे.

सोशल मिडीयाचा खुबीने उपयोग करत त्यांनी फळमाशांना प्रतिबंध करण्याची केलेल्या उपायोजनचे कौतुक होत आहे. सद्यस्थितीमध्ये पावसाळी हंगामामध्ये गोंडाळ यांनी काकडी, पडवळ, दोडकी याच्यावर प्रादुर्भाव करणार्‍या फळमाशीला अटकाव करण्यासाठी या सापळ्याचा उपयोग केला आहे.

यु ट्युबवरील व्हिडीओ पाहून त्यांनी लूर गोळीचा वापर करीत प्लास्टीक बाटल्यांच्या आधारे सापळा बनविला असून त्या सापळ्यामध्ये हजारो हजारो रूपयांच्या नुकसानीचा तडाखा देणार्‍या हजारो फळमाशा अडकल्या आहेत.

सद्यस्थितीमध्ये या प्रयोग यशस्वी झाल्याचे चित्र दिसत असून भविष्यामध्ये या प्रयोग आंबा हंगामामध्ये बागायतदारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. गोंडाळ हे आंबा व्यवसायिक असून त्यांनी गत हंगामात पाठवलेल्या आंबा पेट्यांमध्ये बहुतांशी आंबे खराब निघाल्याने त्यातून, त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते.

आंबे नेमके खराब का होतात याबाबत केलेल्या निरिक्षणाअंती फळमाशीच्या प्रार्दुभावामुळे आंबा फळ खराब होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या फळमाशीला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने त्यांनी यु ट्युबच्या आधारे माहिती मिळवली.

मिळालेल्या माहितीप्रमाणे बाटलीच्या सहाय्याने सापळा तयार करण्यासाठी त्यांना कृषी पदविकाधारक गावातील तरूण नामदेव गोंडाळ यांचे सहकार्य लाभले.

फळमाशी तयार झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणात अ‍ॅटक करते. त्यामध्ये ही फळमाशी या फळातील रस शोषून घेऊन त्यामध्ये ती अळी घालते. त्यामुळे या फळांना कीड सदृश्य लागण होऊन तयार फळे पुर्णत: बाधित होतात.

प्लास्टीकच्या बाटलीत छोटे छोटे होल मारून त्या बाटलीवर रंगीत पिवळा कलर मारण्यात आला आहे. अशा रंगीत बाटलीमध्ये अर्ध्यावर पाणी भरले. त्यावर लूरची गोळी टांगली.

लूरच्या वासाने आणि रंगीत पाण्याकडे फळमाशा आकर्षित होतात आणि बाटलीत शिरतात. बाटलीमध्ये असलेल्या लूर गोळीच्या वासाने त्यांना गुंगी येते आणि आपसूक त्या खालच्या पाण्यात पडतात.

पावसाळी काकडी, पडवळ, दोडकी लागवडीवर प्रादुर्भाव करणार्‍या फळमाशीसाठी त्यांना हा प्रयोग केला असून तो काहीप्रमाणात यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक केले जात आहे.