भारतमातेचा सुपुत्र अनंतात विलीन! जवान सुधीर निकम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : जवान सुधीर निकम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Udayanraje Bhosale

जवान निकम हे गुजरातमधील जामनगर (Gujarat Jamnagar) इथं कर्तव्य बजावत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळं त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात (Mumbai Private Hospital) उपचार सुरु होते.

नागठाणे (सातारा) : कर्तव्य बजावताना निधन पावलेले जवान सुधीर सूर्यकांत निकम (Jawan Sudhir Suryakant Nikam) यांच्या पार्थिवावर आज सकाळी अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वेळी अपशिंगेसह परिसरातील विविध गावांतून आलेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

या वेळी अपशिंगेसह परिसरातील विविध गावांतून आलेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

जवान निकम हे गुजरातमधील जामनगर (Gujarat Jamnagar) इथं कर्तव्य बजावत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळं त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात (Mumbai Private Hospital) उपचार सुरु होते.

जवान निकम हे गुजरातमधील जामनगर (Gujarat Jamnagar) इथं कर्तव्य बजावत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळं त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात (Mumbai Private Hospital) उपचार सुरु होते.

अशातच काल (मंगळवारी) पहाटे त्यांचे निधन झाले. हे वृत्त समजताच अपशिंगे (मिलिटरी) गावावर शोककळा पसरली होती.

दरम्यान, आज सकाळी त्यांचे पार्थिव अपशिंगे (मिलिटरी) गावात (Apshinge Military) आणण्यात आले. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. काही वेळानंतर सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून त्यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ  झाला.

या अत्यंयात्रेत अपशिंगेसह परिसरातील विविध गावांतून आलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येथील विजयस्तंभाजवळ अंत्ययात्रा आल्यावर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), युवा नेते सागर पाटील, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, बोरगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, अपशिंगेच्या सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच राजश्री करांडे आदींनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले.

सातारा जिल्हा पोलिस दलाच्या (Satara Police Force) वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शेवटी शोकाकुल वातावरणात सुधीर यांचे बंधू सागर व मुलगा श्रवण यांनी त्यांच्या चितेला भडाग्नी दिली. या वेळी उपस्थित जनसमुदायाने "भारत माता की जय" " वीर जवान सुधीर निकम अमर रहे" च्या घोषणा दिल्या.

go to top