गहुंजे ते खालापूर जलदगती महामार्गाची सद्य स्थिती

गुरुवार, 16 जानेवारी 2020

कोटींच्या कोटी टोल वसुलीचा पैसा जातो कुठे?

कोटींच्या कोटी टोल वसुलीचा पैसा जातो कुठे?
गहुंजे ते खालापूर टोलनाका या जलदगती महामार्गावर ठिकठिकाणी तुटलेले लोखंडी संरक्षण कठडे, कॉंक्रीटच्या रस्त्यावर मधोमध पडलेले खड्डे, कॉंक्रीटच्या रस्त्यावर केलेले अर्धवट डांबरीकरण, दुभागजकाजवळील तुटलेल्या बायफ्रेन रोप यामुळे जलदगती महामार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. मुंबईला जाताना वेळ वाचवण्यासाठी भरमसाट टोल देण्यासाठी नागरीक तयार असतात. त्यातुन कोट्यावधींची वसुली होत आहे. मात्र, जलदगती महामार्गावरुन जाताना एक्‍सप्रेस अडथळे पार करुनच मुंबईला पोचावे लागत आहे. या अडथळ्यांबाबत दाद कुठे मागायची अशी नागरीक विचारणा करीत आहेत. सद्य स्थितीची छायाचित्रे टिपली आहेत. सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.