Anant chaturthi 2020 : आठवणीतला बाप्पा 

Tuesday, 1 September 2020

पुणे - लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर आदी रस्त्यावर गणेश मंडळांच्या रथापुढे रंगावलींचे आविष्कार... गुलालाची, फुलांची उधळण... गणेश दर्शनासाठी सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी असे चित्र गणपती विसर्जना दिवशी दरवर्षी दिसते.  घरांतील गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर नागरिकांची पाऊले मोठ्या गणेश मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आणि गणेश दर्शनासाठी शहरातील मिरवणुकींचे विविध मार्ग आणि टिळक चौकाकडे वळत. सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा गर्दीने फुलून जात.

पुणे - लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर आदी रस्त्यावर गणेश मंडळांच्या रथापुढे रंगावलींचे आविष्कार... गुलालाची, फुलांची उधळण... गणेश दर्शनासाठी सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी असे चित्र गणपती विसर्जना दिवशी दरवर्षी दिसते.  घरांतील गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर नागरिकांची पाऊले मोठ्या गणेश मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आणि गणेश दर्शनासाठी शहरातील मिरवणुकींचे विविध मार्ग आणि टिळक चौकाकडे वळत. सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा गर्दीने फुलून जात. गणेश मंडळे रस्त्यावर आल्यानंतर त्यापुढे ढोल पथकांचे वादन, घंटनाद, पारंपारिक नृत्ये होत. शाळकरी मुले त्यांची कला सादर करीत. नंतर महापालिकेच्या वतीने प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना श्रीफळ देऊन सत्कार केला जात. नंतर मिरवणूक विसर्जन घाटाकडे निघत असे. पण या वर्षी हा नजारा पाहायलाच मिळाला नाही. त्यामुळे गेल्यावर्षीच्या विसर्जनातील काही आठवणींना सकाळच्या संग्रहित छायचित्रातून उजाळा देऊ या. (छायाचित्रकार - प्रमोद शेलार)

Edited By - Prashant Patil