Gudi Padwa 2022 | पुरण पोळी, बासुंदी, पुऱ्या अन् बरचं काही, गुढीपाडव्यादिवशी घरीच बनवा स्वादिष्ट पदार्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gudi Padwa 2022 : गुढीपाडव्यादिवशी घरीच बनवा स्वादिष्ट पदार्थ

Gudi Padwa 2022 Make these delicious dishes at home

यंदा शनिवारी म्हणजेच 02 एप्रिल रोजी गुढीपाडवा (Gudi Padwa) सण आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा शालिवाहन शक वर्ष 1944 शुभकृत् संवत्सराचा प्रारंभ होत आहे. युगाब्द 5124 चा प्रारंभ होत आहे. गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. यादिवशी प्रत्येकांच्या घरात अनेक प्रकारचे गोडपदार्थ बनवले जातात. चला तर मग जाणून घेऊयात, गुढीपाडवा या सणादिवशी कोणते पदार्थ बनवले जातात.

1) पुरण पोळी (Puran poli)

साहित्य- 
- कणीक- चार वाट्या
- तेल- एक चमचा
- मीठ चवीपुरते

कृती-
- कणकेमध्ये तेल व मीठ घालून पुरेसे पाणी घालून पुऱ्यांपेक्षा थोडी सैल कणीक भिजवून घ्या.
- नंतर त्याचे लहान-लहान गोळे तयार करा.
- गोळा पोळपाटावर गव्हाच्या पिठावर पुरीएवढा लाटून घ्या.
- त्यानंतर तेल लावून त्याची त्रिकोणी घडी घाला.
- हलक्या हाताने मोठी पोळी लाटा. 
- त्यानंतर तव्यावर टाकून व्यवस्थित सर्व बाजूने भाजा.

1) पुरण पोळी (Puran poli) साहित्य- - कणीक- चार वाट्या - तेल- एक चमचा - मीठ चवीपुरते कृती- - कणकेमध्ये तेल व मीठ घालून पुरेसे पाणी घालून पुऱ्यांपेक्षा थोडी सैल कणीक भिजवून घ्या. - नंतर त्याचे लहान-लहान गोळे तयार करा. - गोळा पोळपाटावर गव्हाच्या पिठावर पुरीएवढा लाटून घ्या. - त्यानंतर तेल लावून त्याची त्रिकोणी घडी घाला. - हलक्या हाताने मोठी पोळी लाटा. - त्यानंतर तव्यावर टाकून व्यवस्थित सर्व बाजूने भाजा.

2) बासुंदी (Basundi)

साहित्य-
- दूध - तीन लीटर
- साखर- दीड वाटी
- वेलदोडा पूड- एक चमचा
- जायफळ पूड- पाव चमचा
- चारोळी- दोन चमचे
- बदामाचे काप - आवडीनुसार

कृती
- प्रथम दूध तापवून दीड ते पावणेदोन लीटर होईल एवढे आटवून घ्या.
- नंतर त्यात साखर घालून परत एक उकळी आणा. 
- खाली उतरून त्यात वेलदोडा, जायफळ पूड, बदामाचे काप आणि चारोळी घाला.
- बासुंदी काचेच्या भांड्यात ठेवा.
- बासुंदीचे भांडे गार पाण्यात अथवा फ्रिजमध्ये ठेवा. 
- बासुंदी शक्यतो आदल्या दिवशी करुन ठेवा, आणि त्यानंतर गारच वाढा.

2) बासुंदी (Basundi) साहित्य- - दूध - तीन लीटर - साखर- दीड वाटी - वेलदोडा पूड- एक चमचा - जायफळ पूड- पाव चमचा - चारोळी- दोन चमचे - बदामाचे काप - आवडीनुसार कृती - प्रथम दूध तापवून दीड ते पावणेदोन लीटर होईल एवढे आटवून घ्या. - नंतर त्यात साखर घालून परत एक उकळी आणा. - खाली उतरून त्यात वेलदोडा, जायफळ पूड, बदामाचे काप आणि चारोळी घाला. - बासुंदी काचेच्या भांड्यात ठेवा. - बासुंदीचे भांडे गार पाण्यात अथवा फ्रिजमध्ये ठेवा. - बासुंदी शक्यतो आदल्या दिवशी करुन ठेवा, आणि त्यानंतर गारच वाढा.

3) पुरी (Puri)
 साहित्य
- कणीक-चार वाट्या
- हरभरा डाळीचे पीठ- एक चमचा
- तेल अर्धी वाटी
- मीठ चवीपुरते
- साखर अर्धा चमचा
- पाणी

कृती
- कणकेमध्ये चवीनुसार मीठ, साखर, तेल, हरभरा डाळीचे पीठ घालून पाण्याने कणीक घट्ट भिजवा. 
- थोड्या वेळाने कणीक चांगली मळून त्याच्या छोट्या- छोट्या गोळे करुन लाटा आणि तळून घ्या.

3) पुरी (Puri) साहित्य - कणीक-चार वाट्या - हरभरा डाळीचे पीठ- एक चमचा - तेल अर्धी वाटी - मीठ चवीपुरते - साखर अर्धा चमचा - पाणी कृती - कणकेमध्ये चवीनुसार मीठ, साखर, तेल, हरभरा डाळीचे पीठ घालून पाण्याने कणीक घट्ट भिजवा. - थोड्या वेळाने कणीक चांगली मळून त्याच्या छोट्या- छोट्या गोळे करुन लाटा आणि तळून घ्या.

4) केळे व डाळिंब दाणे कोशिंबीर (Salad)
 साहित्य-
- पिकलेली केळी चार
- लाल डाळिंबाचे दाणे एक वाटी
- गोड दही अर्धी वाटी
- साखर पाच सहा चमचे
- किंचीत मीठ
- ओले खोबरे पाव वाटी

कृती-
- सुरवातीला केळी उभी कापून त्याच्या चकत्या करा
- त्यावर डाळिंबाचे दाणे, साखर, दही, ओले खोबरे, मीठ घालून एकत्र कालवा.

4) केळे व डाळिंब दाणे कोशिंबीर (Salad) साहित्य- - पिकलेली केळी चार - लाल डाळिंबाचे दाणे एक वाटी - गोड दही अर्धी वाटी - साखर पाच सहा चमचे - किंचीत मीठ - ओले खोबरे पाव वाटी कृती- - सुरवातीला केळी उभी कापून त्याच्या चकत्या करा - त्यावर डाळिंबाचे दाणे, साखर, दही, ओले खोबरे, मीठ घालून एकत्र कालवा.

5) पंचामृत (Panchamrit)
साहित्य-
- सुक्या खोबऱ्याचे पातळ काप आणि दाण्याचे कूट प्रत्येकी अर्धी वाटी
- तिळाचे कूट
- चिंचेचा कोळ
- भिजवलेले शेंगदाणे प्रत्येकी पाव वाटी
- हिरव्या मिरच्या चार पाच
-  पाणी एक वाटी
- मीठ चवीनुसार
- धनेपूड व जिरेपूड पाव चमचा
- फोडणीसाठी तेल चार-पाच चमचे
-  फोडणीचे साहित्य

कृती

- प्रथम फोडणी करून त्यात खोबऱ्याच काप, मिरच्यांचे तुकडे, भिजलेले शेंगदाणे घालून सर्व परता. 
- त्यावर चिंचेचा कोळ व पाणी घालून चांगले शिजवून घ्यो. 
- पाण्याला दाटपणा येण्यासाठी दाण्याचे कूट,तिळाचे कूट घाला. मीठ, गूळ, जिरे व धनेपूड घालून एक उकळी आणा.
-  आंबट गोड या दोन्ही चवी येणे आवश्यक आहे.
- धार्मिक कार्याच्या वेळी हा पदार्थ जरूर करतात.

5) पंचामृत (Panchamrit) साहित्य- - सुक्या खोबऱ्याचे पातळ काप आणि दाण्याचे कूट प्रत्येकी अर्धी वाटी - तिळाचे कूट - चिंचेचा कोळ - भिजवलेले शेंगदाणे प्रत्येकी पाव वाटी - हिरव्या मिरच्या चार पाच - पाणी एक वाटी - मीठ चवीनुसार - धनेपूड व जिरेपूड पाव चमचा - फोडणीसाठी तेल चार-पाच चमचे - फोडणीचे साहित्य कृती - प्रथम फोडणी करून त्यात खोबऱ्याच काप, मिरच्यांचे तुकडे, भिजलेले शेंगदाणे घालून सर्व परता. - त्यावर चिंचेचा कोळ व पाणी घालून चांगले शिजवून घ्यो. - पाण्याला दाटपणा येण्यासाठी दाण्याचे कूट,तिळाचे कूट घाला. मीठ, गूळ, जिरे व धनेपूड घालून एक उकळी आणा. - आंबट गोड या दोन्ही चवी येणे आवश्यक आहे. - धार्मिक कार्याच्या वेळी हा पदार्थ जरूर करतात.