ज्ञानवापीमध्ये शेषनाग आणि देवीदेवतांचे निशाण सापडल्याचा दावा; पाहा फोटो
उत्तरप्रदेशमधील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात शिवलिंग आढळून आल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान ही परिसर सील करण्यात आला आहे.
ज्ञानवापी मशिद ही उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथे असून काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाजूला आहे.
दिल्लीच्या काही महिलांनी ज्ञानवापी मशिदीच्या पूजेची मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने मशिदीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते.
व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवत या मशिदीचा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्वेक्षणात पहिल्यांदा मशिदीच्या भिंतीवर स्वस्तिक चिन्ह आढळले होते.
त्यानंतर मशिदीच्या आतल्या भागात शिवलिंग आढळल्याचा दावा वकिलांनी केला होता. त्यानंतर त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
त्याचबरोबर शेषनाग आणि देवीदेवतांचे निशाण या सर्वेक्षणादरम्यान सापडल्याचा दावा करण्यात आला होता.
शिवलिंग सापडल्यावर मशिदीच्या परिसरातील काही भाग सील करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.