फोटोग्राफर ते ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री| happy birthday Uddhav Thackeray political journey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोग्राफर ते ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री

उद्धव ठाकरेंना राजकारणापेक्षा फोटोग्राफीची आवड, वडिलांच्या आदेशावरून राजकारणात झाले सक्रीय.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

 उद्धव ठाकरेंना राजकारणापेक्षा फोटोग्राफीत रस असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. परंतु वडिलांच्या आदेशावरून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि सक्रिय झाले.

 27 जुलै 1960 रोजी मुंबईत जन्मलेले उद्धव जेजे स्कूलमधून पदवीधर आहेत. पत्नी रश्मी ठाकरे, दोन मुले आदित्य आणि तेजस असा त्यांचा परिवार आहे.

उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीची आवड आहे. त्यातही त्यांची स्पेशालिटी आहे एरिअल फोटोग्राफी.

बाळासाहेबांनी सर्वात अगोदर 2002 मध्ये उद्धव यांच्याकडे बीएमसी निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती.

२००३ साली बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष पद सोपवले.

राज्यात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

उद्धव ठाकरेंच्या आत्या त्यांना लहानपणी श्रावणबाळ म्हणायच्या. त्याचं कारणही तसंच आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव लहानपणापासून अतिशय शांत आहे.

सामनातील लेखाद्वारे त्यांनी आपली आक्रमक प्रतिमा निर्माण केली.उद्धव ठाकरे कोणतीही निवडणूक न लढवता मुख्यमंत्री होणारे राज्याचे पहिले नेते ठरले.

उद्धव ठाकरेंच्या राजकीय प्रवासामागे कोणाची प्रेरणा असेल तर ती त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची. उद्धव यांच्या राजकीय जडणघडणीत रश्मी यांचा खूप मोठा वाटा आहे.

go to top