Health Tips: वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल साइडर व्हिनेगर घेताय? होऊ शकतात या 5 गंभीर समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips: वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल साइडर व्हिनेगर घेताय? होऊ शकतात या 5 गंभीर समस्या

Apple Cider Vinegar Tips

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर बहुतेक घरांमध्ये वापरले जाते. हे सफरचंदाच्या रसापासून तयार केलेले व्हिनेगर आहे. पदार्थांची चव वाढवण्यापासून आरोग्य बनवण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. म्हणूनच याला शक्तिशाली पेय देखील म्हणतात. जीवनसत्त्वांसोबतच अनेक प्रकारची पोषकतत्त्वेही यामध्ये असतात. जे तुमच्या शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर रक्तातील साखर कमी करणे, वजन कमी करणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, रक्तदाब कमी करणे, संधिवात कमी करणे यासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. पण जसे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे अ‍ॅपल सायडर व्हिनेगरच्या फायद्यांसोबतच काही तोटेही आहेत. पण, हे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही ते जास्त प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीने वापरता. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर योग्य प्रकारे कसे वापरावे? हे जाणून घेण्यापूर्वी जाणून घ्या याचा जास्त वापर कोणत्या 5 आजारांना आमंत्रण देऊ शकतो ते.

1) गॅस्ट्रोपेरेसिस - 
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पोट भरल्याची भावना वाढवते जे उत्कृष्ट आहे. कारण ते कमी कॅलरी खाण्यास मदत करते. परंतु यामुळे गॅस्ट्रोपेरेसिस देखील होऊ शकतो. या स्थितीत पोटातील शिरा नीट काम करत नाहीत, त्यामुळे पोट रिकामे करणे कठीण होते. एनसीबीआयच्या अहवालानुसार, टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ही स्थिती अधिक दिसून येते. या प्रकरणात, व्हिनेगरच्या सेवनाने त्याची लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात. गॅस्ट्रोपेरेसिसच्या लक्षणांमध्ये छातीत जळजळ, सूज येणे आणि मळमळ यांचा समावेश होतो.

1) गॅस्ट्रोपेरेसिस - अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पोट भरल्याची भावना वाढवते जे उत्कृष्ट आहे. कारण ते कमी कॅलरी खाण्यास मदत करते. परंतु यामुळे गॅस्ट्रोपेरेसिस देखील होऊ शकतो. या स्थितीत पोटातील शिरा नीट काम करत नाहीत, त्यामुळे पोट रिकामे करणे कठीण होते. एनसीबीआयच्या अहवालानुसार, टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ही स्थिती अधिक दिसून येते. या प्रकरणात, व्हिनेगरच्या सेवनाने त्याची लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात. गॅस्ट्रोपेरेसिसच्या लक्षणांमध्ये छातीत जळजळ, सूज येणे आणि मळमळ यांचा समावेश होतो.

2) दात किडणे - 
एका अभ्यासानुसार, अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन दात किडण्याशी संबंधित आहे. याच्या सेवनामुळे तुम्हाला दात पिवळे पडण्याची समस्या देखील येऊ शकते. यामध्ये असलेले अ‍ॅसिड दातांची संवेदनशीलता वाढवते. विशेषतः जर तुम्ही नियमितपणे व्हिनेगर घेत असाल तर हा त्रास होऊ शकतो.

2) दात किडणे - एका अभ्यासानुसार, अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन दात किडण्याशी संबंधित आहे. याच्या सेवनामुळे तुम्हाला दात पिवळे पडण्याची समस्या देखील येऊ शकते. यामध्ये असलेले अ‍ॅसिड दातांची संवेदनशीलता वाढवते. विशेषतः जर तुम्ही नियमितपणे व्हिनेगर घेत असाल तर हा त्रास होऊ शकतो.

3) पोटॅशियमची पातळी कमी होते आणि हाडांची झीज -
पोटॅशियमच्या कमी पातळीमुळे हायपोक्लेमिया होऊ शकतो. हे अ‍ॅपल सायडर व्हिनेगरच्या जास्त वापरामुळे होते. हे हाडांची खनिज घनता देखील कमी करू शकते, ज्यामुळे हाडे नाजूक होतात. अशा परिस्थितीत हाडे तुटण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. म्हणून, ऑस्टियोपोरोसिस असलेल्या लोकांसाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करण्याची शिफारस केलेली नाही.

3) पोटॅशियमची पातळी कमी होते आणि हाडांची झीज - पोटॅशियमच्या कमी पातळीमुळे हायपोक्लेमिया होऊ शकतो. हे अ‍ॅपल सायडर व्हिनेगरच्या जास्त वापरामुळे होते. हे हाडांची खनिज घनता देखील कमी करू शकते, ज्यामुळे हाडे नाजूक होतात. अशा परिस्थितीत हाडे तुटण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. म्हणून, ऑस्टियोपोरोसिस असलेल्या लोकांसाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करण्याची शिफारस केलेली नाही.

4) त्वचेची जळजळ - 
त्वचा निरोगी बनवण्यासाठी तुम्ही अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर केला असेल. एका अहवालात असे सांगितले गेले आहे की, यामुळे तुमची त्वचा बर्न होऊ शकते. हे त्याच्या मजबूत अम्लीय स्वभावामुळे आहे. हे थेट चेहऱ्यावर लावल्याने असे होते.

4) त्वचेची जळजळ - त्वचा निरोगी बनवण्यासाठी तुम्ही अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर केला असेल. एका अहवालात असे सांगितले गेले आहे की, यामुळे तुमची त्वचा बर्न होऊ शकते. हे त्याच्या मजबूत अम्लीय स्वभावामुळे आहे. हे थेट चेहऱ्यावर लावल्याने असे होते.

5) घशात जळजळ होणे -
अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अन्ननलिका बर्न करण्याची क्षमता असते. व्हिनेगरची तिखट आम्लता घशात जळजळ करू शकते. यासोबतच अ‍ॅपल सायडरच्या गोळ्यांमुळेही अन्ननलिकेचा त्रास होऊ शकतो.

5) घशात जळजळ होणे - अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अन्ननलिका बर्न करण्याची क्षमता असते. व्हिनेगरची तिखट आम्लता घशात जळजळ करू शकते. यासोबतच अ‍ॅपल सायडरच्या गोळ्यांमुळेही अन्ननलिकेचा त्रास होऊ शकतो.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापर कसा करावा -
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर थोड्या प्रमाणात घेण्यास सुरुवात करा आणि हळूहळू तुमच्या वैयक्तिक सहनशीलतेनुसार, दररोज जास्तीत जास्त 2 चमचे (30 मिली) पाण्यात मिसळून सेवन करा. व्हिनेगर कोणत्याही पाण्यात किंवा इतर गोष्टींमध्ये मिसळूनच वापरा. तसेच, जर तुम्हाला गॅस्ट्रोपेरेसिस असेल तर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाळा किंवा फक्त 1 चमचे (5 मिली) पाण्यात किंवा सॅलड ड्रेसिंगमध्ये वापरा. तसेच त्याचा थेट त्वचेवर वापर करू नका. यामुळे जळजळ होऊ शकते, खाज सुटू शकते.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापर कसा करावा - अ‍ॅपल सायडर व्हिनेगर थोड्या प्रमाणात घेण्यास सुरुवात करा आणि हळूहळू तुमच्या वैयक्तिक सहनशीलतेनुसार, दररोज जास्तीत जास्त 2 चमचे (30 मिली) पाण्यात मिसळून सेवन करा. व्हिनेगर कोणत्याही पाण्यात किंवा इतर गोष्टींमध्ये मिसळूनच वापरा. तसेच, जर तुम्हाला गॅस्ट्रोपेरेसिस असेल तर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाळा किंवा फक्त 1 चमचे (5 मिली) पाण्यात किंवा सॅलड ड्रेसिंगमध्ये वापरा. तसेच त्याचा थेट त्वचेवर वापर करू नका. यामुळे जळजळ होऊ शकते, खाज सुटू शकते.