sakal

बोलून बातमी शोधा

भारती सिंगने १५ किलो वजन केलं कमी; सांगितला खास डाएट प्लान

कॉमेडियन भारती सिंगने १५ किलो वजन कमी केलं आहे. वजन कमी करण्यासाठी काय केलं, याबद्दल भारतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

वजन कमी केल्यामुळे डायबिटीज आणि अस्थमा यांच्यावरही नियंत्रण आल्याचं तिने सांगितलं.

भारतीचं आधी वजन ९१ किलो होतं. आता तिचं वजन ७६ किलो इतकं आहे.

"आता दम लागत नाही. मला हलकं वाटतं. डायबिटीज आणि अस्थमा यांच्यावरसुद्धा नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे", असं भारती म्हणाली.

संध्याकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत काहीच खात नसल्याचं भारतीने यावेळी सांगितलं. "संध्याकाळी ७ वाजल्यानंतर मी काहीच खात नाही. ३०-३२ वर्षांपर्यंत मी खूप काही खाल्लं आहे आणि त्यानंतर शरीराला एक वर्षाचा वेळ दिला आहे. आता शरीरसुद्धा सगळ्या गोष्टींचा स्वीकार करतंय", असं ती पुढे म्हणाली.

वजन कमी झाल्यानंतर स्वत:ला ऑनस्क्रीन पाहताना खूप अभिमान वाटत असल्याचं भारतीने सांगितलं.

भारती सध्या 'द कपिल शर्मा शो' आणि 'डान्स दिवाने ३'मध्ये काम करतेय

डान्स दिवाने या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया मिळून करतात.

सध्या भारती तिच्या नव्या लूकमध्ये फार चर्चेत आहे.