sakal

बोलून बातमी शोधा

असं वाढवा बाईकच्या टायरचे आयुष्य; जाणून घ्या खास टिप्स

Bike tyre

बाईक असो की कार, टायर हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.परंतु लोक टायरला जास्त महत्त्व देत नाहीत. टायरशिवाय बाइक कार वाहनाची कल्पना करणे कठीण आहे. टायर नेहमी जमिनीच्या संपर्कात असतो आणि त्यामुळे तुमचे वाहन चालू शकते. टायरला कधी चांगल्या किंवा कधी खराब रस्त्यांवरून जावं लागते. अशामुळे टायरची झीज होते. टायरचे आयुष्य कसे वाढवायचे, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एयर प्रेशर- तुमच्या बाईकच्या टायरमध्ये हवेच्या दाबाची योग्य पातळी नेहमी ठेवा. एका बाईकच्या टायरमधील हवेचा दाब इतर बाईकपेक्षा वेगळा असू शकतो, तुम्ही ज्या कंपनीची बाईक घ्याल, त्यावर मॅन्युअल छापलेले असते, त्यानुसार तुमच्या बाईकच्या टायरमध्ये हवा ठेवावी.

स्पीड आणि ब्रेक्सचा कौशल्याने वापर करा- बाईक चालवताना मर्यादित वेगाची काळजी घेतली पाहिजे, अशा स्थितीत तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते सर्वात महत्त्वाचे ठरते. बाईकचा वेग अचानक वाढवू नका आणि अचानक कमीही करू नका, त्यामुळे तुमचा मागील टायर खराब होतो.

पार्किंग- दिवसेंदिवस ज्या प्रकारे तापमान वाढत आहे, अशा स्थितीत नेहमी आपले वाहन शेडमध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी पार्क करा .

व्हील अलाइनमेंट- तुम्ही तुमचे व्हील अलाइनमेंट वेळोवेळी तपासले पाहिजे, यासाठी युजर मॅन्युअलमध्ये दिल्याप्रमाणे व्हील अलाइनमेंट करा. चुकीच्या अलाइनमेंट टायरचे आयुष्य कमी होऊ शकते.

टॅग्स :Bikesmotor cycle