सध्या मशिदींवरील भोंगे उतरण्यावरून राजकारण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातल्या विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी सकाळच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यात आली होती. शिवाय मुंबईतील काही ठिकाणी अजान वाजली नाही. राज्यभरात मशिदीवरील पोलिस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. (Hanuman Chalisa Row)
मुंबईतील मिनारा मस्जिद परिसरात सकाळपासूनच शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. याठिकाणी अजान लाऊडस्पीकरवर झाली नाही. पायधुनी पोलिसांनी मशीदीच्या ट्रस्टच्या सदस्यांसोबत बैठकीत पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर न करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मिनारा मशीदीने चांगला प्रतिसाद दिला. याठिकाणी कोणतेही आंदोलन झाले नाही.
मुंबईतील संवेदनशील अशा भेंडी बाजार परिसरातील मोगल मस्जिद येथे आज सकाळी अजान लाऊडस्पीकरवर झाली नाही. शिया मुस्लिमांचे हे प्रार्थनास्थळ आहे. डोंगरी पोलिसांचा बंदोबस्त याठिकाणी पहाटेपासूनच होता. कोणतेही आंदोलन किंवा अप्रिय घटना घडली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले.
कासा वरोती येथील सुन्नी जामा मस्जिद बाहेर पोलीस बंदोबस्त असून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही.
अलिबाग, महाड, रोहा, मुरुड या संवेदनशील आणि मुस्लिम बहुल शहरांमध्ये पोलिसांचा मशिदी समोर बंदोबस्त आहे. होमगार्ड, पोलीस यांच्यासह एसआरपी, क्यूआरटी दलाचे पथक तैनात आहेत.
आज सकाळ नेहमीप्रमाणे नमाजीचे भोंगे वाजले, पण कुठेही मनसे ने भोंगे उतरविणे किंवा हनुमान चालीसाचे पठण झाल्याचे दिसून येते 5 नाही.
याप्रकरणी सुजाता डेरेंसह पाच महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन ठिकाणी हा प्रकार घडला असून एका ठिकाणचे कार्यकर्ते फरार झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नाशिकसह सातपूर
मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मस्जिदी समोर हनुमान चालीसा पठण करण्याचां प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटीही झाली.
या सर्व संदर्भात सातपुरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी अधिक माहिती दिली, की पहाटेच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी सातपूर येथील प्रार्थना स्थळासमोर हनुमान चालीला पठण करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी याकार्यकर्त्यांना ताब्यात घेवून तात्काळ कारवाई केली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.